मुंबई : विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी (Mumbai University Senate Election) अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर होत असताना अचानक निवडणूक स्थगित (Senate Election Cancelled) करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर (Chief Minister Eknath Shinde) निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीला सामोरे जायला घाबरतात, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Attacks Eknath Shinde ) यांनी केला. तसेच मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही राज्यपालांना पत्र लिहून भाजपवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री डरपोक : काल रात्री अकरा वाजता सिनेट निवडणुकीचे पत्र बाहेर आले. पुढील आदेशापर्यंत निवडणूक पुढे ढकलण्यात आली. निकाल 100 टक्के आमच्या बाजूने लागला असता. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यात मणिपूरसारखे वातावरण नाही, भांडणं, वाद नाहीत. यासाठी दीड लाख मतदारांनी नोंदणी केली आहे. मग अचानक काय झालं? निवडणूक स्थगित का झाली? कालची बैठक कुठे झाली? असे प्रश्न आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारला विचारले आहेत. मुंबई विद्यापीठाचे अधिकारी फोन बंद करून बसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डरपोक आहेत का? अशी टीका देखील ठाकरे यांनी सरकारवर केली आहे. लोकसभा निवडणुकाही जाहीर होऊन पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आदित्य ठाकरेंनी वर्तवली आहे. सिनेट तुमचे सरकार पाडणार नाही, आम्हीच तुमचे सरकार पाडू, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी : काल रात्री अकराच्या सुमारास विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव, निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरूड यांनी शासकीय पत्राचा संदर्भ देत निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. विद्यापीठाने जाहीर केलेली निवडणूक 10 सप्टेंबर रोजी होणार होती. या निवडणुकीसाठी विद्यार्थी संघटनांनी चांगली तयारी केली होती. मात्र रातोरात पत्रक काढून निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
हेही वाचा -