मुंबई: मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे मार्ग दोन प्रकल्प काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या कामामुळे मानखुर्द उपनगरामध्ये रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. मात्र ती आता खोळंबलेली आहे. डीएन नगर ते वांद्रा आरटीओ कोल्हापूर व चेंबूर आणि मानखुर, असा हा यलो लाईन 2 मार्ग बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र मानखुर्दमध्ये या प्रकल्पाच्या कामामुळे रस्त्यावरील वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.
वाहतूक पूर्णपणे खुळंबलेली: मेट्रो मार्ग दोन हा एकूण 23 किलोमीटर लांबीचा आहे. यामध्ये 20 उन्नत स्थानकांचा समावेश आहे. हा मार्ग पश्चिम पूर्व मध्य मनोरेल तसेच मेट्रोमार्ग तीन आणि मेट्रो मार्गाच्या यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या प्रकल्पाचे काम सुरू आहे. पूर्व उपनगरे पश्चिम उपनगरे व हार्बर रेल्वे मार्ग जवळील सर्व रस्ते देखील या मेट्रो मार्ग दोनमुळे जोडले जातात. मात्र प्रकल्पाच्या कामामुळे गेल्या 30 मिनिटापासून रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे खुळंबलेली आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकासमोर पूल आहे. या पुलाच्या उतरणीला मेट्रो यलो लाईन दोनचे काम सुरू आहे. या कामामुळेच दुचाकी आणि चार चाकी वाहनांना येथून जाताना प्रचंड वेळ लागत आहे.
रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा: मेट्रो मार्ग दोन याला यलो लाईन दोन असे म्हटले जाते. यामध्ये एसीक नगर प्रेम नगर इंदिरानगर नानावटी हॉस्पिटल मार्गे 19 वे मेट्रोस्थानक मानखुर्द असणार आहे. आणि याच मानखुर्द उपनगरामध्ये प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे त्याचा अडथळा रस्त्यावरील वाहतुकीला झालेला आहे. त्यामुळे गेल्या 30 मिनिटापासून मानखुर्द उपनगरातील या भागातील वाहतूक कोळंबलेली असल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.
येल्लो लाईन दोनचे काम सुरू: या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी शरद शेळके यांनी ईटीव्ही सोबत बातचीत केली त्यांनी म्हटलेलं आहे. की मेट्रो येल्लो लाईन दोनचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी मोठाले खड्डे म्हणून ठेवलेले आहे, सामान रस्त्यावर पडलेला आहे. या प्रकल्पाच्या कामामुळे खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारच्या वाहतुकीला प्रचंड अडथळा होत आहे. पोलीस यंत्रणा या ठिकाणी जर असली आणि मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधिकारी या ठिकाणी असले तर त्यांना लक्षात येईल की, जनतेला किती त्रास होतो आहे.