मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. सरकारच्या या नवीन नियमावलीमुळे मुंबईतील व्यापारी नाराज आहेत. आधीच लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. त्यातच या निर्बंधांमुळे व्यापारी चिंतेत आहेत. या निर्णयामुळे व्यवसायात खूप नुकसान होईल आणि याचा ई-कॉमर्स कंपन्यांना फायदा होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
'सरकारच्या नवीन नियमांमुळे महाराष्ट्रातील व्यवसायांचे फार नुकसान होईल. कारण ओव्हरहेड्स, देखभाल शुल्क, पगार, भाडे व्यवहारिक नसल्याने बहुतेक दुकाने आणि रेस्टॉरंट्स केवळ खर्च वाचवण्यासाठी बंद ठेवली जातील', असे मत व्यक्त करत रिटेल ट्रेडर्स वेलफेयर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी सरकारच्या नव्या नियमावलीवर नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहेत नवीन नियम?
* महाराष्ट्र सरकारच्या आधीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज जी शहरे लेव्हल 3 वर होती. ती शहरे नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार लेव्हल 4 किंवा 5 वर जाऊ शकतात.
* मुंबई व इतर सर्व शेजारील भागातील सर्व दुकाने आणि रेस्टॉरंट्समध्ये सोमवारपासून लेव्हल 3 चे अनुसरण करावे लागेल.
* जी ठिकाणे लेव्हल 2 आणि लेव्हल 1 वर आहेत. सोमवारपासून त्यांना लेव्हल 3 चे नियम लावले जातील.
* आधीसारखे मुंबई लेव्हल 3 च्या पातळीवर राहील. मुंबईत अनावश्यक दुकाने/रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुले राहतील.
* आवश्यक सेवा देणारी दुकाने आठवड्यातून 7 दिवस खुली राहतील.
काय सुरू, काय बंद?
- १ व २ लेव्हलचे जिल्हे ३ मध्ये येतील.
- थिएटर बंद राहतील.
- रेस्टॉरंट ४ वाजेपर्यंतच सुरू राहणार.
- लोकल फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सुरू राहणार.
- राज्यातील सार्वजनिक स्थळे सकाळी ५ ते ९ पर्यंतच सुरू राहणार.
- शासकीय उपस्थिती ५० टक्के.
- जमावावर पूर्णपणे प्रतिबंध.
दरम्यान, नवीन डेल्टा प्लस कोरोना आणि भारत सरकारकडून तिसऱ्या लाटेच्या संभाव्य शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हे नवीन नियम आधारित आहेत.
हेही वाचा - डेल्टा प्लस व्हेरिएंटचा महाराष्ट्रात अधिक धोका.. राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू