मुंबई - मुसळधार पावसामुळे वडोदरा स्थानकात रुळावर पाणी भरल्याने पोरबंदर, अहमदाबाद येथून मुंबईला येणाऱ्या आणि मुंबई येथून वडोदरा, भूजला जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 1 ऑगस्टला काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या अंशतः रद्द केल्या आहेत. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
1 ऑगस्टला रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या -
- गाडी नंबर 19036 अहमदाबाद ते वडोदरा एक्सप्रेस रद्द
- गाडी नंबर 19035 वडोदरा ते अहमदाबाद रद्द
- गाडी नंबर 1906 पोरबंदर ते मुंबई सेंट्रल
- गाडी नंबर 69106 अहमदाबाद आनंद एक्सप्रेस रद्द
- गाडी नंबर 69102 अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेस
- गाडी नंबर 22904 भुज बांद्रा एक्सप्रेस
- गाडी नंबर 22924 जामनगर बांद्रा टर्मिनस रद्द
2 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या
- गाडी नंबर 1905 मुंबई सेंट्रल ते पोरबंदर
- गाडी नंबर 19115 दादर भुज एक्सप्रेस रद्द
- खालील गाड्यांचे करण्यात आले अंशतः रद्दीकरण
- गाडी नंबर 12934 अहमदाबाद मुंबई सेंट्रल गाडी बोरिवली येथे थांबवण्यात येईल आणि बोरिवली ते मुंबई सेंट्रल दरम्यान रद्द राहील
- गाडी नंबर 12932 अहमदाबाद मुंबई सेंट्रल गाडी बोरिवली येथे थांबवण्यात येईल आणि बोरिवली ते मुंबई सेंट्रल दरम्यान रद्द राहील
- गाडी नंबर 22955 बांद्रा भुज एक्सप्रेस नवसारी येथे थांबवण्यात येईल आणि पुन्हा गाडी नंबर 22956 नवसारी ते बांद्रा दरम्यान धावेल