ETV Bharat / state

राज्य सहकारी बँक घोटाळा : प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करा - सर्वोच्च न्यायालय

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून दोषीं विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या आदेश देण्यात आले होते. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील 70 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर या संदर्भात निष्पक्ष, स्वतंत्र व मुंबई उच्च न्यायालयाच्या कुठल्याही निरीक्षणाशिवाय चौकशी करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालय, दिल्ली
author img

By

Published : Sep 2, 2019, 4:29 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश योग्य आहेत. या संदर्भात निष्पक्ष, स्वतंत्र व मुंबई उच्च न्यायालयाच्या कुठल्याही निरीक्षणाशिवाय चौकशी करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून दोषीं विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या आदेश देण्यात आले होते. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील 70 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात लवकरच चौकशीसुद्धा केली जाणार आहे. त्याला अनुसरून या प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, यासाठी पवार यांनी सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कुठलीही चौकशी केली जाऊ नये, ही प्रमुख मागणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी करण्यात आली.

हेही वाचा - नेते पक्ष सोडत असतील तरी फरक पडणार नाही, कार्यकर्ते आमच्यासोबत - अजित पवार

काय आहे प्रकरण -

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे राज्यातील काही साखर कारखाने व सूत गिरण्यांना कोट्यवधींचे कर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र, ही वाटण्यात आलेली कर्जे पुन्हा वसूल न झाल्याने बँकेला मोठ्या प्रमाणात तोटा झाला होता. कर्ज वाटप करण्याच्या काळात बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार, हसन मुश्रीफ व शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आदींचा समावेश होता. तसेच ज्या सूत गिरण्या व साखर कारखान्यांना कर्ज देण्यात आली, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंध असल्याचा आरोप न्यायालयात दाखल याचिकेत करण्यात आला होता.

हेही वाचा - केंद्रासह महाराष्ट्र व कर्नाटक सरकारला महापुराबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे 'सर्वोच्च' आदेश

Intro:महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश योग्य असून या संदर्भात होणारी चौकधी ही निष्पक्ष, स्वतंत्र व मुंबई उच्च न्यायालयाच्या कुठल्याही निरीक्षणा शिवाय करण्यात यावी असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. Body:महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून दोषी विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासह 70 हुन अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . या संदर्भात लवकरच चौकशीही सुद्धा केली जाणार आहे त्याला अनुसरून अजित पवार यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत मागणी करण्यात आली आहे की या प्रकरणी होणारी चौकशी ही निष्पक्ष आणि स्वतंत्र पद्धतीने केली जावी. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कुठलीही चौकशी केली जाऊ नये ही प्रमुख मागणी सुप्रीम कोर्टात सोमवारी करण्यात आली. Conclusion:काय आहे प्रकरण -

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे राज्यातील काही साखर कारखाने व सूत गिरण्यांना कोट्यवधींचे कर्ज वाटप करण्यात आले होते , मात्र ही वाटण्यात आलेली कर्जे पुन्हा वसूल न झाल्याने बँकेला तोटा मोठ्या प्रमाणात झाला होता. कर्ज वाटप करण्याच्या काळात बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार , हदन मुश्रीफ व शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा समावेश होता. ज्या सूत गिरण्या व साखर कारखान्यांना कर्ज देण्यात आली त्यांचा संबंध हा राष्ट्रवादी पक्षाशी संबंध असल्याचा आरोप न्यायालयात दाखल याचिकेत करण्यात आला होता.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.