मुंबई - मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 'ठाकरे' हे आडनाव त्यांना वडिलोपार्जित आले आहे. यापुढे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी उध्दव ठाकरे यांच्याबद्दल कोणताही उदगार काढल्यास शिवसेनेची महिला आघाडी त्यांना सोडणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी दिला आहे.
एखादी स्त्री लग्न करून सासरी येते तेव्हा नवऱ्याचे आडनाव लावते. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे उध्दव ठाकरे हे सुपूत्र आहेत. त्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले. आनंदीबाईंनी सत्तेच्या लालसेपोटी पेशवांच्या अपमान केला होता. तशाच प्रकारे या आनंदीबाई वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असताना शिवसेनेने त्यांचा कोणताही अपमान केला नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेचे अपमान करू नये, अन्यथा त्यांना शिवसेनेच्या महिला आघाडी त्यांचा हिसका दाखवेल, असे राजुल पटेल म्हणाल्या.
हेही वाचा - अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाल्या ‘ठाकरे’ नाव लावून...
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
अमृता फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करून जोरदार टीका केली होती. फक्त 'ठाकरे' आडनाव असून कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही. फक्त आपले कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करावं लागतं, असे त्या म्हणाल्या होत्या.