मुंबई - खारमधील एका तीन मजली रिकाम्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना आज (सोमवार) पहाटे घडली. सुदैवान यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे परिसरातील वाहतूकीची कोंडी झाली आहे.
कोसळलेली इमारत पूर्णपणे जीर्ण झाली होती. या आधीच इमारतीचा काही भाग कोसळला होता. इमारत रिकामी असल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे वाहतूक टर्नर रोड आणि एसव्ही रोडवर वळवण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.