ETV Bharat / state

Mumbai Crime: इंटरनेटवर आत्महत्या करण्याचे शोधायचा तो उपाय, थेट अमेरिकेतून फोन आल्यानंतर मुंबई पोलिसांनी वाचविले प्राण - आत्महत्या करण्याचे सोपे उपाय

इंटरनेटवर आत्महत्या करण्याचे सोपे उपाय शोधणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचा मुंबई पोलिसांनी जीव वाचवला. मुंबई पोलीस यांना 25 वर्ष तर त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळतात त्या तरुणास ताब्यात घेवून त्यास आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले.

suicide case
आत्महत्येपासून केले परावृत्त
author img

By

Published : Feb 16, 2023, 9:59 AM IST

मुंबई : फेब्रुवारीला USNCE इंटरपोल वॉशिंग्टन यांच्याकडून नवी दिल्ली येथील इंटरपोलला माहिती देण्यात आली की, कुर्ला पश्चिम येथील किस्मत नगर परिसरातील एक तरुण इंटरनेटवर आत्महत्या करण्याचे सोपे उपाय सर्च करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे त्यांनी बऱ्याच वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या माहितीचे गांभीर्य ओळखून नवी दिल्ली येथील इंटरपोल विभागाने मुंबई पोलीस विभागातील गुन्हे शाखेच्या इंटरपोल कक्षाला दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या इंटरपोल कक्षाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि ही माहिती त्वरित गुन्हे शाखेच्या कक्ष पाचला दिली.

नैराश्यग्रस्त होवून आत्महत्या: या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अजीत गोंधळी आणि पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून, इतर माहितीच्या आधारे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. हा तरुण जोगेश्वरी पश्चिमेकडे राहतो. त्याला किस्मत नगर, कुर्ला परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा तरुण आयटी इंजीनीयर म्हणुन एका खाजगी कंपनीत काम करतो. पोलिसांनी त्याला पाहतात घेऊन आत्महत्येचे कारण विचारले असता त्याने त्याच्या शिक्षणाकरीता आणि दैनंदिन गरजांकरीता वेगवेगळया खाजगी संस्थांकडुन कर्ज घेतल्याचे सांगितले. कमी पगारात कर्जाचे हफ्ते आणि घरखर्च भागवु शकत नसल्याने नैराश्यग्रस्त होवून आत्महत्या करण्याचा विचार करीत होता.

तरुणाचे केले समुपदेशन: हा तरुण यापूर्वी तीन-चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्नात तो असफल झाला. त्यानंतर आत्महत्या करण्याकरीता सोपा उपाय संगणकावर शोधुन आत्महत्या करण्याचा विचार केल्याचे त्यांने सांगितले. या तरुणाला ताब्यात घेवून त्याचे समुपदेशन करून त्यास आत्महत्येपासून परावृत्त करण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे. अशाप्रकारे मुंबई पोलिसांनी एका तरुणाचा जीव वाचवला आहे. चिंताग्रस्त तरुणाचे समुपदेशन करून त्याला त्याच्या आईवडीलांचे ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर मानसोपचार करण्याबाबत तज्ञ डॉक्टरांना दाखवण्यात बाबत त्याच्या आईवडीलांना कळविण्यात आले आहे. मुलाचा जीव वाचवल्याबद्दल त्याच्या आईवडीलांनी मुंबई पोलीसांचे आभार मानले आहेत.

मुंबई पोलीसांचे यश: अश्या प्रकारे आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाबाबत प्राप्त माहीतीचे तात्काळ तांत्रीक विश्लेषण करून नैराश्याने त्रासलेल्या तरुणाला ताब्यात घेवून त्यास आत्महत्येपासून परावृत्त करण्याची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अप्पर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, उप आयुक्त (प्रकटीकरण) प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त (मध्य) नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष पाचचे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, पोलीस निरीक्षक अजित गोंधळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक भुजबळ, पोलीस हवालदार धनंजय पैंगणकर, पोलीस शिपाई गणेश काळे, चालक पोलीस हवालदार अरविंद मालुसरे यांनी केली आहे.

हेही वाचा: Beed Crime जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची आत्महत्या बीडच्या मानगुटीवर आत्महत्येचे भूत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.