ETV Bharat / state

Mumbai Police : मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, दोन वर्षांपूर्वी चोरीला गेलेली रिक्षा चालकाला केली सुपूर्द - Mumbai police recovered stolen rickshaw

आपली एखादी वस्तू चोरीला गेल्यानंतर ती मिळणार की नाही या चिंतेत आपण असतो. मात्र आपली वस्तू आपल्याला मिळाक्याने खूप आनंद होतो. तसाच काहीसा आनंद एका ऑटोरिक्षा चालकाच्या चेहऱ्यावर आज पाहायला मिळाला. या रिक्षावाल्याच्या आनंदाला कारणीभूत ठरले ते मुंबई पोलीस.

Mumbai Police
दोन वर्षांआधी चोरीला गेलेली रिक्षा शोधून काढली
author img

By

Published : Feb 22, 2023, 7:20 AM IST

मुंबई : 2020 मार्चमध्ये कोरोनाचे संकट सगळ्यांवरच कोसळले. त्यानंतर हळूहळू जनजीवन सुरळीत होऊ लागले. त्यानंतर अमरनाथ शर्मा त्यांचा रिक्षा चालवण्याचा धंदा हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला. वांद्रे पूर्व येथे राहणारे रिक्षाचालक अमरनाथ कुटुंबाचा गाडा ते रिक्षा चालवून मिळणाऱ्या पैशातूनच हाकत होते. अमरनाथ यांचा मुलगा आपल्या वडिलांच्या रिक्षाच्या धंद्यात हातभार लावून रिक्षा चालवण्याचे काम करायचा. मात्र अचानक एके दिवशी अमितकुमार रिक्षा घेऊन गेला असताना वांद्रे पूर्व येथील मेट्रो स्टेशनजवळ गल्ली नंबर दोन रिक्षा चोरीस गेली.

कर्ज काढून रिक्षा खरेदी : अमरनाथ शर्मा यांनी 1995 मध्ये कर्ज काढून रिक्षा खरेदी केली होती. अमरनाथ शर्मा हे मूळचे उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील असून ते वांद्रे पूर्व येथे आपल्या कुटुंबासह राहतात. रिक्षा चालून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांचं कुटुंब चालत असे. मात्र, 2021 मध्ये अमरनाथ यांची रिक्षा चोरीस गेली आणि त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. कुटुंबाचा उदरनिर्वाह आता कसा होणार असा प्रश्न पडलेला अमरनाथ शर्मा यांनी दुसऱ्याची रिक्षा चालवून स्वतःसह कुटुंबाचे पोट भरू लागले.

खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार : 2021 मध्ये रिक्षा चोरीस गेल्यानंतर अमितकुमार या अमरनाथ शर्मा यांच्या मुलाने खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून खेरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अमरनाथ शर्मा यांची बजाज ऑटो रिक्षा क्रमांक एमएच02 इएफ 5734 रोजंदारीचे साधन होती. मात्र ती चोरीस गेल्यानंतर अमरनाथ शर्मा यांचे वर्षभर मोठे नुकसान झाले. त्यानंतर अचानक खेरवाडी पोलीस ठाण्यातून अमरनाथ तुमचा मुलगा अमित कुमार यांना आनंदाची बातमी देणारा 2023 मध्ये फोन आला.

चोरीस गेलेली रिक्षा परत मिळाली : खेरवाडी पोलिसांनी अमित कुमार त्यांना त्यांची चोरीस गेलेली रिक्षा परत मिळाल्याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर अमरनाथ यांना त्यांनी पहिली घेतलेली रिक्षा परत मिळाल्याने खूप आनंद झाला. त्यातच विशेष सांगायचे म्हणजे प्रसिद्ध चित्रपट रोहित शेट्टी यांच्या हस्ते अमरनाथ शर्मा यांना त्यांची रिक्षा देण्यात आली. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक पंचाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे देखील उपस्थित होते. ई टीव्ही भारतशी बोलताना अमरनाथ शर्मा यांनी मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले. तसेच माझी रिक्षा आम्हाला परत मिळाल्याने खूप आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त दिली.

हेही वाचा : Holi Special Train: मुंबई ते जयनगर आणि बलिया दरम्यान होळी स्पेशल ट्रेन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.