मुंबई : कॉर्डिलिया क्रूझ आर्यन खान प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कॉर्डिलिया क्रूझवर ड्रग्ज सिंडिकेट सक्रिय असल्याची माहिती देणारा ईमेल शनिवारी मुंबई पोलिसांना आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी संबंधित मेलची माहिती संबंधित तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
काय आहे मेलमध्ये - मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, हा मेल काही गोपनीय अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी क्रूझवरील सुरक्षेची काळजी घेणाऱ्या संबंधित एजन्सी आणि विभागाला या मेलबाबत कळवले होते.
क्रूझ सोमवारी येणार मुंबईत - पोलिस सूत्रांनी सांगितले की, शनिवारी सकाळी 10 वाजता मेल प्राप्त झाला होता. ज्या मेलमध्ये कथितरित्या क्रूझमध्ये ड्रग्ज पुरवठ्याबद्दल सांगितले होते. शनिवारी सायंकाळी 4 वाजता निघणारी क्रूझ सोमवारी रात्री उशिरा परत येणार आहे. यात बहुतेक उच्च घरातील तरुण मुले आणि मुली आनंद घेण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी येतात.
प्रवाशांची होणार कसून तपासणी - या मेलमध्ये पुढे असे म्हटले आहे की, क्रूझवरील ड्रग्जचा पुरवठा काही डीजे बँडशी संबंधित काही रशियन नागरिकांद्वारे केला जातो. जे ड्रग्ज पुरवठ्याचा मुख्य व्यापार करत आहेत. सूत्रांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी सुरक्षा यंत्रणांना ग्रीन गेटवरच प्रवाशांची तपासणी करण्यास सांगितले आहे.
क्रूझची सुरक्षा सीआयएसएफकडे - कॉर्डिलिया क्रूझवरील सुरक्षेची काळजी सीआयएसएफकडून घेतली जाते, असे सांगण्यात येत आहे. मात्र, आर्यन खान प्रकरणाच्या वेळी ही सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर नार्कोटिक कंट्रोल ब्युरो या केंद्रीय एजन्सीने क्रूझवर छापा टाकून अनेकांना अटक केली होती.
आर्यन खान प्रकरण - कार्डिलिया कूझमध्ये ड्रग पार्टी सुरू असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानंतर तत्कालीन एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीन वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या क्रूझवर छापेमारी केली होती. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. या अटकेवरून अनेक वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप झाले होते.
हेही वाचा -