मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुंबईसह राज्यात आजपासून संचारबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून पोलिसांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईतील भायखळा येथे पोलिसांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या तपासणीसाठी नाकाबंदी लावली आहे. ही नाकाबंदी 1 मे पर्यंत दिवस रात्र सुरू राहील, असे वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपर्यंत लांबणीवर
नाकाबंदीमध्ये तपासणी करताना विनाकारण व अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी वाहनचालकांचे ओळखपत्र आणि वाहनचालकासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशाची झाडाझडती घेतली जात आहे. हेच चित्र मुंबईतल्या प्रत्येक चौकामध्ये दिसत आहे. सकाळपासून नियमांचे उल्लंघन करणार्या शेकडो वाहनचालकांवर कारवाई केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. याबाबत 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी यांनी आढावा घेतला.
हेही वाचा - कोरोनाबाधितांसाठी मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल बीएमसीच्या ताब्यात