ETV Bharat / state

Mumbai Crime : भायखळा महिला कारागृहात तैनात असलेल्या पोलिसाची आत्महत्या - नागपाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद

सध्या राज्यात पोलिसांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.यात आता मुंबईत आणखी एका पोलीसाने आत्महत्या केली आहे. पोलीस घटनेची अधिक माहिती घेत आहेत. त्यांच्या आत्महत्येचे मागचे करण अद्याप समजू शकलेले नाही.

Mumbai Crime
आत्महत्या
author img

By

Published : Feb 24, 2023, 11:05 AM IST

मुंबई : नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भायखळा महिला कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेट गार्ड म्हणून मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदार तैनात होते. काल गुरुवारी 8.05 ते 9.20 दरम्यान या पोलीस हवालदाराने गोळी मारून आत्महत्या केली आहे. श्याम वारघडे असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

श्याम रामदास वारघडे पोलिसाचे नाव : भायखळा महिला कारागृह मेन गेट येथे कर्तव्य बजावत असताना नेमणुकीस असलेले श्याम रामदास वारघडे यांनी गोळी मारून आत्महत्या केली. या घटनेबाबत त्यांचे सहकारी यांनी १०० नंबर कॉल करून माहिती दिली असता नागपाडा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. कलम १७४ सि. आर. पि. सि. अन्वये मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजण्याकरीता मृतदेह हा जे जे रूग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला आहे. पुढील चौकशी चालू आहे.

जागेवर मृत्यू झाला : श्याम वारघडे यांनी गोळी झाडून घेतल्याने त्यांचा जागेवर मृत्यू झाला आहे. पोलीस हवालदार वारघडे हे जुनी पोलीस वसाहत हंसराज लेन, भायखळा पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या भायखळा येथे राहवयास होते, अशी माहिती आहे. ते घरी एकटेच रहात होते. कुटुंबीय त्यांच्या मूळ गावी राहत असून त्यांना दारूचे व्यसन असल्याची माहिती मिळते. पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

आत्महत्ये मागचे कारण अद्याप अस्पष्ट : भायखळा महिला कारागृहात गेट गार्ड म्हणून तैनात असलेल्या श्याम वारघडे या पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ताडदेव लोकल आर्म युनिट २ मध्ये ते काम करत होते. त्यांची नियुक्ती भायखळा महिला जेलच्या गेटवर करण्यात आली होती. श्याम वारघडे हे आपल्या कुटुंबापासून दूर मुंबईत एकटेच राहत होते. त्यांचे कुटुंबिय त्यांच्या मूळ गावी रहातात. त्यांच्या आत्महत्ये मागचे नेमके कारण अद्याप समजलेले नसून त्याचा तपास नागपाडा पोलीस करत आहेत. यापूर्वी देखील मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांनी तणावातून किंवा वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत.

हेही वाचा : Anil Bonde VS Tushar Umale : मरण आले तरी घाबरणार नाही, पण माफी मागणार नाही- शिवव्याख्याते तुषार उमाळेंची प्रतिक्रीया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.