ETV Bharat / state

Anil Jaisinghani Arrested : वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक; अमृता फडणवीस धमकी प्रकरणाचे कनेक्शन - अमृता फडणवीस धमकी प्रकरण

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे दहा कोटींची खंडणी मागणाऱ्या अनिक्षा जयसिंघानीला गेल्या शुक्रवारी मलबार हिल पोलिसांनी उल्हासनगर येथून अटक केली होती. त्यानंतर काल रात्री मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने वरिष्ठांच्या आदेशानुसार मोठी कारवाई करत अनिक्षाचे वडील बुकी अनिल जयसिंघानीला गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. अमृता फडणवीस धमकी प्रकरणी जयसिंघानी हे नाव चर्चेत आले होते. अनिल हा अनेक वर्षापासून फरार होता.

Anil Jaisinghani Arrested
वॉन्टेड बुक्की अनिल जयसिंघानीला गुन्हे शाखेच्या सायबर सेलने केली अटक
author img

By

Published : Mar 20, 2023, 2:14 PM IST

Updated : Mar 20, 2023, 4:36 PM IST

वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांच्या लाचेसह बुकींची माहिती देण्याची ऑफर दिली होती. व्हिडीओ, ऑडिओ क्लिप्स आणि अन्य मेसेज पाठवून 10 कोटींची खंडणीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला अटक केल्यानंतर वाॅन्टेड बुकी अनिल जयसिंघानीचे नाव चर्चेत आहे.

Anil Jaisinghani Arrested
वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

अनिल जयसिंघानीला अटक : सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बालसिंग रजपूत यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून फरार असणारा अनिल जयसिंघानी याला अटक करण्यासाठी विशेष ऑपरेशन राबवण्यात आले होते. अनिल जयसिंघानीला अटक करण्यासाठी एजे हे विशेष ऑपरेशन करण्यात आले होते. आरोपी अनिल जयसिंघानी इंटरनेटचा वापर करून अनेकांच्या संपर्कात होता. आरोपीवर विविध राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन ओळख लपवून राहत होता.

रात्री 11:45 वाजता आरोपीला ताब्यात घेतले : पुढे रजपूत यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांची 5 पथके अनिल जयसिंघानिला शोधण्यासाठी काम करत होती. त्यानुसार तीन पथके गुजरात येथे पाठवण्यात आली. आरोपी हा महाराष्ट्रातून शिर्डी, शिर्डीतून गुजरातच्या बरदोली इथे गेल्याचे कळले होते. त्यानुसार या आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली होती. आरोपीने 72 तास गुजरातमध्ये पोलिसांना चकवा दिला होता. काल रात्री 11:45 वाजता त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

इंटरनेट वापरण्यासाठी असणारी विविध यंत्रणाही जप्त : गुजरात पोलिसांच्या मदतीने ऑपरेशन मुंबई पोलिसांनी यशस्वी राबवले. 13 मार्चला अनिल जयसिंघानी हा शिर्डी येथे होता. नंतर 14 तारीख पासून तो गुजरात येथे फरार झाला. गुजरातमध्ये 72 तास पोलिसांना गुंगारा देत होता. वडोदारा, भरुच नंतर गोध्रा येथे जात असताना 72 तासांच्या चकव्यानंतर गोध्रा येथील कलोल येथून बुकी अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेली गाडी ही महाराष्ट्र पासिंगची असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनिल जयसिंघानी याच्यासोबत त्याचा ड्रायव्हर आणि त्याचा एक नातेवाईक यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल डिव्हाइसेस आणि इंटरनेट वापरण्यासाठी असणारी विविध यंत्रणाही जप्त करण्यात आली असल्याचे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बालसिंग रजपूत यांनी सांगितले.

न्यायालयात हजर करणार : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलने मोठी कारवाई करत सहा वर्षांपासून फरार असलेल्या बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक केली आहे. त्याचप्रमाणे बुकी अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा हिला गेल्या शुक्रवारी उल्हासनगर येथून अटक करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने तिला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. त्याप्रमाणे आज तिची पोलीस कोठडी संपत असून तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मुलीवरील केस बोगस : वाॅन्टेड बुकी अनिल जयसिंघानी म्हणाला, आमच्यावर अन्याय झाला आहे. मी काही बोलल्यास मुलीला कोठडीत त्रास होईल. माझ्या मुलीवर केलेली केस पूर्णपणे बोगस आहे. अनिक्षाला पोलीस कोठडीच्या बाहेर येऊ द्या. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. असा दावा त्यांनी केला आहे. सोबतच माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल. माझी प्रकृती बरी नाही. माझे वयही झाले आहे. मी कागदपत्रे पाठवेन. आमच्यासोबत अन्याय होत आहे. हे सर्व देव बघत आहे, असेही अनिल जयसिंघानी यांनी म्हटले होते.

10 कोटीच्या खंडणीची मागणी : बुकी अनिल जयसिंघानी आणि फॅशन डिझायनर मुलगी अनिक्षा विरोधात गुन्हा दाखल केला गेला. नंतर मलबार हिल पोलिसांनी गुरुवारी अनिक्षाला उल्हासनगरातील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. तिला शुक्रवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी पोलिसांतर्फे केलेल्या युक्तीवादात अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याकडे तब्बल 10 कोटी रुपांच्या खंडणीची मागणी केल्यासह काही धक्कादायक खुलासे केले. अनिक्षा ही अन्य व्यक्तींच्या सांगण्यावरुन अमृता फडणवीस यांना भेटत होती. आपल्या वडिलांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यासाठी ती प्रयत्न करत होती. मात्र या सगळ्यात काही राजकीय व्यक्तींचाही सहभाग असण्याची दाट शक्यता असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

हेही वाचा : Baba Ramdev On Allopathy : अ‍ॅलोपॅथीमुळे किडनी खराब होतात..बाबा रामदेव यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

Last Updated : Mar 20, 2023, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.