ETV Bharat / state

NISARGA : नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन - निसर्ग चक्रीवादळ लाईव्ह अपडेट

मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये व त्यांच्याकडील महत्त्वाच्या वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे ही सुरक्षित ठिकाणी ठेवावी. याबरोबरच मुंबई पोलीस व महानगरपालिकेला सहकार्य करावे, असेही आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. मुंबई पोलीस दलातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलिसांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

nisarg cyclone live update  nisarg cyclone mumbai news  nisarg cyclone latest news  निसर्ग चक्रीवादळ लेटेस्ट न्युज  निसर्ग चक्रीवादळ लाईव्ह अपडेट  निसर्ग चक्रीवादळ मुंबई
अशोक प्रणय, पोलीस उपायुक्त
author img

By

Published : Jun 3, 2020, 2:07 PM IST

Updated : Jun 3, 2020, 3:01 PM IST

मुंबई - निसर्ग वादळाला अनुसरून मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपली कंबर कसली असून मुंबई पोलिसांकडून शहरातील वेगवेगळ्या परिसरांमध्ये बंदोबस्त वाढवला आहे. लॉकडाऊन काळात वापरण्यात येणाऱ्या होमगार्ड, सीआयएसएफ, सीआरपीएफ व इतर सुरक्षा यंत्रणांची मदत घेऊन बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचते, अशा ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

NISARGA : नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन
मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये व त्यांच्याकडील महत्त्वाच्या वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे ही सुरक्षित ठिकाणी ठेवावी. याबरोबरच मुंबई पोलीस व महानगरपालिकेला सहकार्य करावे, असेही आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. मुंबई पोलीस दलातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलिसांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. तसेच वादळाच्या परिस्थितीमध्ये अधिक धोका असलेल्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुद्धा मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या दरम्यान अशी घ्या काळजी...

1) मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये जाऊ नये.

2) 3 जून रोजी कोणीही आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही, याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.

3) आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामग्री सोबत घेऊन स्थलांतरीत व्हावे.

4) घराच्या अवती-भवती वादळामुळे कोणत्या वस्तू, विजेचे खांब किंवा तारा, झाडे पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब राहावे.

5) आपले पशूधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षितस्थळी हलवावे.

6) आपल्याजवळ केरोसीनवर चालणारे दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.

7) हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात.

8) सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.

9) आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्त्वाचा असल्यामुळे प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे.

10) पिण्याचे पाणी शुद्धीकरण करून वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडिक्लोर मिसळावे.

11) मच्छीमारांनी आपल्या बोटींचे नुकसान होऊ नये, म्हणून त्यांना सुरक्षितपणे बांधून ठेवण्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

12) अतिवृष्टी व चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्रकिनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी.

13) ग्रामकृती दलाच्या सूचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात.

14) सद्यस्थितीत जिल्ह्यात होम क्वारंटाइन असलेले नागरिक व चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवताना एकमेकापासून सुरक्षित अंतरावर असतील, याची दक्षता घ्यावी.

15) मदत आवश्यक असल्यास आपली ग्रामपंचायत/तहसिलदार कार्यालय/ जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 02352- 226248, 222233 वर संपर्क साधावा.

Last Updated : Jun 3, 2020, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.