मुंबई : ही इमारत पाडण्यासाठी बीएमसीचे अधिकारी बराच काळ कागदोपत्री काम करत होते. प्रदीर्घ कालावधीनंतर महापालिकेने ही इमारत पाडण्याचा निर्णय घेत बुलडोझरच्या सहाय्याने ही इमारत पाडली. इमारत पाडल्यानंतर एसव्ही रस्त्यावरील वाहतूक कमी होणार आहे. तसेच, रस्त्याची रुंदीही वाढणार आहे. ही इमारत पाडण्याचे काम बीएमसीच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. ही इमारत ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आली होती. बीएमसीने सांगितले की, ही (1923)मध्ये बांधलेली इमारत होती, जी पूर्णपणे जीर्ण झाली होती. इमारत पाडल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण : खासदार गोपाळ शेट्टी यांनीही इमारत पाडल्यानंतर मुंबई महापालिका आणि प्रभाग अधिकारी किरण दिघावकर आणि त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत. तसेच, सहकार्य करणाऱ्या इमारतीतील लोकांचे आभार मानले आहेत. या ठिकाणी नागरिकांची ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली होती. ती दुर झाल्याने नागिरक आता व्यवस्थित ये-जा करू शकतात अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, 1923 मध्ये झालेली ही इमारत मोठ्या प्रमाणात जीर्ण झाली होती. त्यामुळे तीही पाडण्यात आली आहे असही ते म्हणाले आहेत.
इमारत पूर्णपणे जीर्ण झाली होती : पी नॉर्थ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले की, ही इमारत ब्रिटीश काळात बांधण्यात आली होती. जुगल किशोर नावाची ही इमारत (1923)मध्ये बांधण्यात आली होती. ती 100 वर्षे जुनी आहे. जी पूर्णपणे जीर्ण झाली होती. यात एकूण 31 भाडेकरू राहत होते. इमारत पाडण्यासाठी 50 मजूर, 17 बीएमसी अधिकारी, 2 फोकल लाइन, एक जीसीबी, 10 डंपर आणि 25 पोलीस कर्मचारी कामाला लागले आहेत. 24 तासांत इमारत पाडल्यानंतर डेब्रिज हटवण्याचे कामही केले जाणार आहे.
नागरिकांना रहदारीपासून दिलासा मिळाला : मालाड एसव्ही रोडच्या मधोमध असलेल्या या इमारतीमुळे पूर्वी मोठी रहदारी असायची. आता या रस्त्याचेही रुंदीकरण होणार असून, नागरिकांना रहदारीपासून दिलासा मिळणार आहे. इमारत पाडल्यानंतर खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबई महानगरपालिका आणि प्रभाग अधिकारी किरण दिघावकर आणि त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत. तसेच, सहकार्य करणाऱ्या इमारतीतील नागरिकांचेही त्यांनी यावेळी आभार मानले आहेत.