ETV Bharat / state

मध्य हार्बर रेल्वे मार्गावर उद्या 'मेगाब्लॉक'

रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेची देखभार आदी कामांसाठी मध्य हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेतला जानार आहे. मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप-जलद मार्गावर सकाळी 11.15 ते 3.45 पर्यत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य हार्बर रेल्वे मार्गावर उद्या 'मेगाब्लॉक'
author img

By

Published : May 25, 2019, 7:19 PM IST

मुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल आदी कामांसाठी मध्य हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. रविवार 26 मे रोजी मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप-जलद मार्गावर सकाळी 11.15 वाजता ते 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.

रविवारी सकाळी 10.37 वाजता ते सायंकाळी 03.06 वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप-जलद मार्गावरील सर्व लोकल दिवा ते परळ स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावरुन धावतील आणि सर्व स्थानकात थांबे घेतील. परळहून पुढे या लोकल सीएसएमटीच्या दिशेला जलद मार्गावरुन धावतील आणि 20 मिनिटे उशिराने पोहचतील.

रविवारी सकाळी 10.05 ते दुपारी 3.22 वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद व अर्ध जलद गाड्या आपल्या नियोजित स्थानका व्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबा घेतील आणि 20 मिनिटे उशिरा पोहचतील. सकाळी 11 वाजता ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या व येणाऱ्या सर्व धीम्या गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.

या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे होणार शॉर्ट टर्मिनेशन -

50104 रत्नागिरी-दादर गाडी दिवा स्थानकात थांबवण्यात येईल. 50103 दादर-रत्नागिरी गाडी दिवा स्थानकातून सुटेल, या गाडीच्या प्रवाशांसाठी दादर येथून विशेष लोकल चालवण्यात येईल. ही लोकल दादर स्थानकातून दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि ठाणे स्थानकात 4 वाजून 6 मिनिटांनी तर दिवा स्थानकात 4 वाजून 13 मिनिटांनी पोहचेल.

हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द दरम्यान रविवारी सकाळी 10.40 वाजता ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत तर सीएसएमटी येथून पनवेल, बेलापूर, वाशीला सुटणाऱ्या गाड्या सकाळी 10.03 वाजता ते दुपारी 3.44 वाजेपर्यंत आणि पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीला रवाना होणाऱ्या गाड्या सकाळी 9.44 वाजता ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत पनवेल-मानखुर्द-पनवेल दरम्यान विशेष लोकल धावेल तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत मेन लाईन व ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

नेतेमंडळींकडून 'जायंट किलर' मानेंचे तोंडभरून कौतुक ; मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता ?

अँकर : आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर अवघ्या तरुण मतदारांसह अनेकांच्या मनात घर केलेले नूतन खासदार धैर्यशील माने यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा तब्बल एक लाख मतांनी पराभव करत संपूर्ण राज्यासह देशात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विजयानंतर धैर्यशील मानेंचे मोतोश्रीवरून कौतुक झालेच पण त्यांची दखल थेट अमित शहा यांनी सुद्धा घेतली असल्याचं समजतंय. दिल्लीतील जंतर मंतरवर लाखोंच्या संख्येने काढलेल्या किसान मोर्चाने मोदी सरकारला सुद्धा घाम फोडणाऱ्या राजू शेट्टींच्या पराभवाची बातमी समजताच मानेंवर महाराष्ट्रातील नेतेमंडळींकडून कौतुकांचा वर्षाव सुरू झाला आहे. त्यामुळेच आता या युवा नेतृत्वाला थेट मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
 
व्हीओ :  नूतन खासदार धैर्यशील मानेंचा राजकीय प्रवास सुद्धा अगदी ग्रामपंचायत निवडणुकीपासून सुरू झाला. 2002 मध्ये त्यांनी रुकडी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी जिल्हापरिषदेची निवडणूक सुद्धा लढवली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे अडीच वर्षे उपाध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवले. या सर्वांच्या माध्यमातून त्यांना जवळपास 15 वर्षांचा राजकीय अनुभव आणि राजकीय वारसा असल्याने गेल्या वर्षभरापूर्वीच त्यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक असून कसल्याही परिस्थिती ही निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्याने धैर्यशील मानेंनी आई माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह सेनेमध्ये प्रवेश करत हातकणंगलेमधून तिकीटही मिळवलं. ज्यांनी राज्याच्या महासुलमंत्र्यांसह देशाच्या पंतप्रधानांना आपल्या विरोधात उभं राहण्याचं आव्हान दिलं होतं त्या राजू शेट्टींशी माणेंचा सामना होणार होता. सुरुवातीच्या काळात माने शेट्टींविरोधात निवडून येण्याचं लांबच त्यांना टक्कर सुद्धा देऊ शकणार नाहीत असं सर्वांना वाटलं होत. पण आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर शेट्टींनी मतदारसंघात काय केले काय केले नाही हे न सांगता मला या मतदारसंघात कोणती विकासात्मक धोरणे घेऊन कामे करायची आहेत हे पटवून देण्यात ते यशस्वी झाले. आणि राजू शेट्टींचा त्यांनी जवळपास 1 लाख मतांनी पराभव केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील युवा मतदारांच्या मिळालेल्या पाठिंब्यावर माने आता थेट लोकसभेत पोहोचले असले तरी आता त्यांच्याकडे मात्र आता मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरुण तडफदार नेतृत्व याच्या जोरावर यापुढेही हा मतदारसंघ आपल्याकडेच शाबूत ठेवण्यासाठी त्यांना आता थेट मंत्रिमंडळात संधी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे. विशेष म्हणजे यावेळच्या मंत्रिमंडळात ५० टक्के नवीन चेहरे असणार असल्याची शक्यता असून महाराष्ट्रातील सेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्री पदांमध्ये मानेंना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

(मनोज सरांना सुद्धा एकदा बातमी वाचायला सांगा मग पब्लिश करा)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.