मुंबई: चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ट्रॅकची दुरुस्ती व दुखभाल करण्याची गरज असते. तसेच सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी जंबो ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
असा असेल मेगाब्लॉक
- मध्य रेल्वे मार्ग- मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड मार्गावर दुरुस्ती आणि देखभाल कामासाठी सकाळी 11 ते 3.55 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 च्या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. मेगाब्लॉक कालावधीत सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबा देण्यात येईल. मुलुंडपुढे धिम्या ट्रॅकवरून चालवण्यात येतील. त्यामुळे वाहतूक 15 मिनिटे उशिराने असेल. ठाण्यावरून सुटणाऱ्या लोकलच्या मार्गतही बदल केला आहे.
- हार्बर रेल्वे- पनवेल - वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला आहे. पनवेल - बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल - बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा मेगाब्लॉक कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते ठाणे या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द केल्या आहेत. मात्र, सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. तर ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे - वाशी - नेरुळ स्थानकांदरम्यान वाहतूक सुरू राहील.
- पश्चिम रेल्वे- पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक असणार वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडून पडणार आहे. सांताक्रूझ - गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत काम चालणार आहे. अप - डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा या वेळेत सांताक्रूझ - गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालवली जाईल. तर बोरिवलीहून सुटणाऱ्या लोकल गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. वाहतूक व्यवस्थेवर यामुळे परिणाम होणार आहे.
विशेष उपनगरीय गाड्या धावणार- ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या धावणार आहेत. ट्रान्सहार्बर आणि उरण मार्गावर नेहमीप्रमाणे रेल्वे सेवा सुरळित चालू राहणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी माहितीनसुार ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल (लोकल) दरम्यानच्या सर्व धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द राहणार आहेत.
हेही वाचा-