ETV Bharat / state

Mumbai International Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ १७ ऑक्टोबरला ६ तास देखभाल दुरुस्तीसाठी बंद

Mumbai International Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ १७ ऑक्टोबरला ६ तास देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. याबाबत सूचना देण्यात आली आहे. वाचा काय खबरदारी घ्यावी लागेल.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 7:36 PM IST

मुंबई Mumbai International Airport - जगातील आणि देशातील अत्यंत गजबजलेलं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथे पावसाळ्यानंतरच्या धावपट्टीची देखभाल करण्यासाठी काही काळ आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार आहेत. 17 ऑक्टोबर सकाळी 11 वाजल्यापासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात या दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील.

देखभाल दुरुस्ती गरजेची - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील रहदारी दिवसेंदिवस वाढलेली आहे. दररोज 900 पेक्षा अधिक विमानांची उड्डाणं दोन्ही धावपट्टीवरून केली जातात. परंतु पावसाळ्यानंतर धावपट्टीवर अनेक प्रकारची देखभाल दुरुस्ती गरजेची असते. मुंबईत पडणारा धो धो पाऊस, यामुळे धावपट्टीची क्षमता कमी होते. धावपट्टीवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असतात. काही ठिकाणी बारीक बारीक खडे वरती येतात. त्यामुळे विमानांच्या चाकांना त्याचा त्रास होऊ शकतो. यातून अपघात होण्याची शक्यताही असते. म्हणूनच ही धावपट्टी नीट करण्यासाठी तब्बल सहा तास दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार आहेत.

मे 2023 मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 43 लाख 43,806 एकूण प्रवाशांनी प्रवास केला. त्यापैकी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेले प्रवासी 21 लाख 960 तर मुंबईतून विदेशात उड्डाण केलेल्या प्रवाशांची संख्या 22 लाख 34,199 इतकी होती. अत्यंत गजबजलेल्या अशा या धावपट्टीवर पावसाळ्यानंतरची देखभाल दुरुस्ती ही दरवर्षी केली जाते. यंदा देखील ती 17 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात येणार असल्याचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने सांगितले आहे.

वार्षिक कामाचा एक भाग - प्राधिकरणाकडून हा देखील मुद्दा अधोरेखित करण्यात आलेला आहे की, दरवर्षी मान्सून नंतर ही देखभाल दुरुस्ती कामे केली जातात. ही तात्पुरत्या स्वरूपाचीच कामे असतात. परंतु विमानतळाच्या पायाभूत सुविधा ज्या आहेत, त्या दर्जेदार ठेवण्यासाठीही देखभाल आवश्यक असते. त्यामुळे हा वार्षिक कामाचा एक भाग आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात दोन्ही धावपट्ट्या 17 ऑक्टोबर रोजी बंद ठेवल्या जाणार आहे.

यामुळे विमानांच्या काही प्रमाणात वेळा बदलू शकतात. त्यासंदर्भातील काही सूचना असतील तर त्या संबंधित प्रवाशांना दिल्या जातील. त्यानुसार प्रवाशांना त्या दिवशी तात्पुरते सहकार्य करावे लागणार आहे.

हेही वाचा - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानींच्या ताब्यात; अदानी समूहाकडे आता देशातील ७ विमानतळाची जबाबदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.