ETV Bharat / state

Old Double Decker Bus : मुंबईकरांना 1937 सालापासून सेवा देणाऱ्या जुन्या 'डबल डेकर बस' सेवेतून होणार निवृत्त; का? ते वाचा सविस्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 9:01 PM IST

Updated : Sep 15, 2023, 12:16 PM IST

Old Double Decker Bus : मुंबईकरांना 1937 सालापासून सेवा देणारी जुनी डबल डेकर बस सेवेतून शुक्रवारी निवृत्त होणार आहे. या बस का बंद केल्या जात आहेत, त्याऐवजी काय पर्याय असेल हे आजच्या या रिपोर्टमधून जाणून घेऊया.

Old Double Decker Bus
जुन्या डबल डेकर बस

बेस्ट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

मुंबई : Old Double Decker Bus : ब्रिटीशकालीन 86 वर्षे जुन्या डबल डेकर बसचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जुनी डबल डेकर बस शुक्रवारी मुंबईच्या रस्त्यांवर शेवटच्या प्रवास (Double Decker Bus Mumbai) करणार आहे. ही बस संग्रहालयात ठेवण्याचीही तयारी सुरूय. 15 सप्टेंबर रोजी या जुन्या बसला हिरवा झेंडा दाखवून तिच्या शेवटच्या प्रवासाला (AC Double Decker Bus Mumbai) सुरुवात होणार आहे. त्यानंतर ही बस मुंबईच्या रस्त्यावर दिसणार नाही. ही बस मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजेच बेस्टद्वारे चालवली जातेय.

बस बंद करण्याचा निर्णय : या सोबतच ओपन रुफ टॉप नॉन-एसी डबल डेकर बसेसही 15 ऑक्टोबरला बंद होणार आहेत. 1937 मध्ये डबल डेकर बसेस मुंबईमध्ये धावू लागल्या. ओपन टॉप डबल डेकर बस 26 जानेवारी 1997 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं सुरू केल्या होत्या. बेस्ट प्रशासनानं जनसंपर्क अधिकारी सुनील वैद्य यांनी सांगितलंय की, या बस त्यांच्या 15 वर्षांच्या सेवेनंतर बंद करण्यात आल्या आहेत. या जुन्या गाड्या आणखी काही काळ सुरू ठेवणं नियमात बसत नाही. त्यामुळं नियमानुसार या बस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

नव्या डबलडेकर एसी बस सुरू : बेस्ट प्रशासनाचे अधिकारी सुनील वैद्य यांनी पुढे बोलताना सांगितलंय की, या बसच्या जागी एसी सुसज्ज डबलडेकर इलेक्ट्रिक बस आणण्याची योजना आहे. या जुन्या बसच्या जागेवर 900 बसची ऑर्डर देण्यात आलीय. सध्या नव्या डबलडेकर 16 एसी बस सुरू आहेत. त्यात आणखी 8 बस लवकरात लवकर ताफ्यात सामील होतील. जुन्या गाड्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं गेल्या काही वर्षांत मुंबई रोडवेजच्या ताफ्यात डबल डेकर बसची संख्या कमी झालीय. या जुन्या एकूण 450 डबल डेकर बस होत्या. ज्या कोरोना कालावधीनंतर फक्त 7 उरल्या. त्यापैकी 4 सामान्यांसाठी धावत होत्या. तर 3 बसेस मुंबई दर्शन सेवा देत होत्या. (old double decker bus service)

मुंबईची एक वेगळी ओळख : याबाबत अधिक माहिती अशी की, लाल डबल डेकर बसेस 1937 मध्ये मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये दाखल करण्यात आल्या. तेव्हापासून त्या मुंबईची एक वेगळी ओळख बनल्या. त्यानंतर मराठी, बॉलिवूड सोबतच इतर चित्रपट सृष्टीनं देखील आपल्या चित्रपटांमध्ये मुंबई दाखवताना या डबल डेकर बसचं चित्रीकरण केलंय. त्यामुळं या बसची क्रेझ वाढत गेली. परंतु 90 च्या दशकाच्या मध्यानंतर या गाड्या जुन्या होवू लागल्यानं या गाड्यांची संख्या हळूहळू कमी झालीय.

पर्यटकांना सेवा : सुनील वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांमध्ये जी ओपन रूफ डबल डेकर बसची क्रेझ आहे ती पाहता, पर्यटकांना मुंबईतील प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी बेस्ट प्रशासन नव्या ओपन रूफ डबल डेकर बसेस खरेदी करणार आहे. या नव्या बस खरेदी करण्याची प्रक्रिया आम्ही आधीच सुरू केलीय. पण, तोपर्यंत नव्या एसी डबल डेकर बस पर्यटकांना सेवा देतील. (old double decker bus will out of service)

30 लाख मुंबईकरांचा प्रवास : दरम्यान, नवीन डबल डेकर ई-बस वातानुकूलित असल्यानं, पर्यटकांना जुन्या बसप्रमाणे समोर बसून आणि उघड्या खिडक्यांमधून चेहऱ्यावर वाऱ्याची झुळूक घेण्याच्या अनंदामध्ये नवीन बसची काळी काच आलीय. सध्या शहरात 3 हजारांहून अधिक बस धावत आहेत. त्यातून दररोज सरासरी 30 लाख मुंबईकर प्रवास करतात.

हेही वाचा :

  1. AC Double Decker Bus : ९०० पैकी ७०० डबल डेकर बससाठी आणखी वाट पाहावी लागणार, नव्याने निविदा मागवल्या
  2. AC Double Decker Bus: जाणून घ्या, नामशेष झालेल्या मुंबईतील डबल डेकर बसचा इतिहास
  3. Nitin Gadkari: मुंबईत येणार हवेत उडणारी बस? काय म्हणाले गडकरी..

Last Updated : Sep 15, 2023, 12:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.