मुंबई: 'नेटफ्लिक्स'वर आज रिलिज झालेल्या 'स्कूप' विरोधात छोटा राजनची याचिका दाखल झाली व त्यावर सुनावणी झाली. या वेब सीरिजमधून आपली प्रतिमा मलीन करण्यात आल्याचा राजनचा दावा होता. माझ्यावर दाखल त्या गुन्ह्यासंदर्भातील खटला न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, या प्रकरणावरील वेब सिरीजमधून माझी बदनामी होत आहे. म्हणून ती वेब सिरीज थांबवावी, अशी छोटा राजनची मागणी होती.
काय आहे राजनचे मत? कुख्यात आरोपी असलेला छोटा राजन हा गँगस्टर टोळीचे नेतृत्व करतो. म्हणून अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. परंतु, त्याने एक महत्त्वाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या बाबी सार्वजनिक केल्या जात आहेत. त्याच्या खासगी आयुष्यावर वेब सिरीजमधून अतिक्रमण केले जात असल्याचे छोटा राजनचे म्हणणे आहे.
एवढ्या रुपयांची नुकसान भरपाई: 2011 मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे यांचा त्यांच्या घराजवळ खून झाला होता. त्या संदर्भातच दुसऱ्या पत्रकार जिग्ना व्होरा त्यांच्यावर आरोप होता. परंतु, त्या निर्दोष सुटल्या होत्या. त्यांनी काही आठवणी लिहिलेल्या आहेत. त्या आठवणींवर आधारित वेब सिरीज सुरू होणार होती. मात्र, त्याचा 'ट्रेलर' पाहून छोटा राजनच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात त्याला स्थगिती मिळवण्यासाठी याचिका दाखल केली गेली. आपली बदनामी झाली म्हणून केवळ एक रुपया नुकसान भरपाई मिळावी, असे देखील याचिकेमध्ये अधोरेखित करण्यात आलेले आहे.
प्रतिज्ञापत्र सादर करा: मुंबई उच्च न्यायालयाचे सुट्टीकालीन न्यायाधीश शिवकुमार दिघे यांच्या एकल खंडापीठासमोर तातडीने दुपारी सुनावणी झाली. त्यांनी या संदर्भात पुढील सुनावणी 7 जून रोजी निश्चित केली. परंतु, छोटा राजनची वेब सिरीज रोखण्याची मागणी फेटाळली. दोन्ही पक्षकारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. ते 5 जून पर्यंत सादर करावे, असे देखील न्यायालयाने म्हटले.
हेही वाचा:
- Chhota Rajan : छोटा राजनची नुकसान भरपाईची याचिका, मागितला केवळ एक रुपया
- Mumbai HC On Child Keeping: वडिलांनी आईला संपवलं; मुलाला मामाकडे ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
- Mumbai HC On Fire Sefety: अग्निसुरक्षा प्रतिबंधात्मकतेसाठी मुंबई महापालिकेने काय अंमलबजावणी केली ते सादर करा- हायकोर्टाचे निर्देश