मुंबई : 2006 मधील एका सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गायक मिका सिंगने अभिनेत्री राखी सावंतच्या मनाविरुद्ध चुंबन घेतले होते. त्या विरोधात तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सतरा वर्ष जुन्या दाखल झालेला प्रथम खबरी अहवाल रद्द करावा, यासाठी मिका सिंग याने उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती. या प्रकरणात मिका सिंगला आज उच्च न्यायलयाकडून दिलासा मिळाला आहे.
2006 या या काळात वाढदिवस असताना मिका सिंग आणि राखी सावंत हे आमने-सामने आले होते. त्यावेळेला इतर सिने अभिनेते आणि सिने अभिनेत्री देखील उपस्थित होत्या. तेव्हा मिका सिंग याने आपल्या मनाविरुद्ध आपले चुंबन घेतले, असा आरोप राखी सावंतने केला. त्याच वेळेला सर्वांसमोर मिका सिंगला तिने दोन शब्द सुनावले. त्यानंतर तिने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार ओशिवरा पोलीस ठाणे मुंबई या ठिकाणी दाखल करण्यात आली होती.
गुन्हा रद्द करण्याकरिता मिका सिंगची उच्च न्यायालयात धाव: तक्रार रद्द करण्याबाबत मिका सिंगच्यावतीने न्यायालयात विनंती अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असल्यामुळे त्या अनुषंगाने मिका सिंग याने प्रथम खबरी अहवाल हा रद्द व्हावा, असे याचिकेत म्हटले. या याचिकेमध्ये मिका सिंग याने अधोरेखित केलेले आहे की, 2006 मधील ही घटना आहे. त्यामुळे आता ही दाखल एफआयआर आता रद्द व्हायला हवी. त्यासाठीचा अर्ज न्यायालयापुढे सादर करीत आहोत.
दोन्ही पक्षकारांनी बाजू मांडली: मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्या खंडपीठांसमोर मिका सिंग याने दाखल केलेली याचिका सुनावणी करिता आली. त्यावेळेला मिका सिंग यांच्या वकिलांची बाजू ऐकून घेऊन त्यानंतर राखी सावंत हिच्या वकिलांना देखील त्याबाबतची विचारपूस न्यायालयाच्यावतीने करण्यात आली. अखेर दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर इतक्या जुन्या दाखल झालेल्या गुन्ह्यावर किती दिवस न्यायालयीन खटला चालवायचा, याचा विचार करावा ही मागणी मिका सिंग याने केली होती. न्यायालयाने अखेर समग्र विचार करत ओशिवरा पोलीस ठाण्यातील दाखल एफआयआर द्द करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले.