मुंबई : पतीचे निधन झाले आहे आणि मृत्यूपूर्वी प्रतिवादी पत्नी ही विमा ग्राहक व्यक्तीची पत्नी म्हणून होती. पतीचे निधन अपघातात झाले आहे. नुकसान भरपाई ही त्या विधवा पत्नीला दिली जावी. मात्र ती अजन्म नुकसान भरपाई पासून वंचित राहावी, अशी अपेक्षा करणे योग्य नाही. त्यामुळे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीचा दावा मुंबई उच्च न्यायालयाने अमान्य केला.
दुसऱ्या लग्नामुळे नुकसान भरपाई मिळण्यास अपात्र : या प्रकरणातील महिलेचा पती गणेश एका दुचाकी वाहनावरून जात होता. तो जात असताना निष्काळजीपणे एक ऑटो रिक्षा चालक रिक्षा चालवत होता. विमा रक्कमेचा दावा करणाऱ्या पत्नीच्या पतीला वाहनाची धडक बसली. उपचार सुरू असतानाच पतीचा मृत्यू झाला. त्यावेळी दावेदार पत्नीचे वय 19 वर्षे इतके होते. त्यानंतर तिने नुकसान भरपाईसाठी याचिका दाखल केली. परंतु याचिका प्रलंबित होती. तिने पुन्हा दुसरे लग्न केले. त्यामुळे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीने असा दावा केला की, तिने दुसरे लग्न केलेले आहे. त्यामुळे तिला आधीच्या पतीच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नसल्याचे विमा कंपनीने म्हटले.
इन्शुरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश : रिक्षाचालकाला फक्त ठाणे जिल्ह्यातच रिक्षा चालवण्याची अनुमती होती. ठाणे जिल्ह्याच्या बाहेर त्याला अनुमती नाही. त्यामुळे रिक्षाचालक देखील भरपाई देण्यास जबाबदार नाही, हे म्हणणे न्यायालयाने फेटाळून लावले. विमा कंपनी देखील भरपाई देण्यात जबाबदार नाही, ही देखील बाब उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दरम्यान तिने पुनर्विवाह केला म्हणून ती नुकसान भरपाई मिळण्यापासून मोटर वाहन कायदा नुसार तिला आडकाठी करता येणार नाही. उच्च न्यायालयाने दावेदार महिलेला इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले.
विमा कंपनीची बाजू अमान्य : न्यायालयाने आपल्या निर्देशामध्ये महत्त्वाची टिपणी देखील केली. न्यायालयाने असे म्हटले की, ऑटो रिक्षा चालकाने ठाणे जिल्ह्याच्या हद्दीबाहेर रिक्षा चालवणे आणि परमिटच्या अटीचे उल्लंघन केले होते. मग विमा पॉलिसीच्या अटी आणि शर्तीचे देखील उल्लंघन होते. हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही साक्षीदाराची तपासणी आपल्या विमा कंपनीकडून केल्याचे दिसत नाही. तसा पुरावा पटलावर दिसत नाही त्यामुळेच ही बाजू उचित वाटत नाही, असे म्हणत न्यायमूर्ती एस जी डीगे यांनी विमा कंपनीची बाजू अमान्य केली.
हेही वाचा : Indore Temple Accident : मंदिर दुर्घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू, लष्कराने हाती घेतले बचावकार्य