ETV Bharat / state

मुंबईत पावसाचे पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या, आदित्य ठाकरेंच्या महापालिकेला सूचना

पावसाळ्यातही कामे नियोजनबद्ध व सुरळीतपणे चालू राहण्याच्या दृष्टीने महापालिकेने काम करावे, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी मान्सूनपूर्व कामांचा सोमवारी (आज) ऑनलाईन पध्दतीने आढावा घेतला.

पालकमंत्री आदित्य ठाकरे
पालकमंत्री आदित्य ठाकरे
author img

By

Published : Apr 26, 2021, 8:29 PM IST

मुंबई - मुंबईत कोस्टल रोड कामाला वेग आले आहे. या कामामुळे पावसाळ्यात मुंबईत पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्या, असे निर्देश पालकमंत्री तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहे.

पावसाळ्यातही कामे नियोजनबद्ध व सुरळीतपणे चालू राहण्याच्या दृष्टीने महापालिकेने काम करावे, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी मान्सूनपूर्व कामांचा सोमवारी (आज) ऑनलाईन पध्दतीने आढावा घेतला. या बैठकीस संबंधीत महापालिका अधिकारी, अतिरिक्त आयुक्‍त, प्रमुख अभियंता तसेच सी, डी व जी-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्‍त आणि कोस्टल रोड टीमचे अधिकारी उपस्थित होते.

'पावसाळ्यात नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित राहणार'

सागरी किनारा मार्ग प्रकल्‍पाची प्रगती व मान्‍सूनपूर्व कामांचा आढावा याबाबत सादरीकरण करण्यात आले. मान्‍सूनपूर्व कामे करण्‍यात येत असून पावसाळ्यात पाण्‍याचा निचरा होण्‍यासाठी पातमुखे, खुला नाला व पंपींगच्‍या माध्‍यमातून कोठेही पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्‍यात आली आहे. तसेच २४ तास नियंत्रण कक्ष पावसाळ्यात कार्यान्‍वीत करण्‍यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

'कोरोना नियमांचे पालन करा'

कामाची प्रगती राखण्‍यासाठी कामगार व इतर साधनसामुग्री यांचे योग्‍य ते नियोजन करण्‍यात यावे, असे निर्देश मंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले. कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन निर्धारीत वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.