ETV Bharat / state

महाराष्ट्र पर्यटन विभागाने आयोजित केला भव्य मुंबई फेस्टिवल; वादग्रस्त विझक्राफ्ट कंपनीकडे आयोजनाची जबाबदारी

Mumbai Festival 2024 : महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून 20 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान मुंबईत भव्य फेस्टीवलचे आयोजन करण्यात आलं आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी सांगितलं. या फेस्टिवलच्या सल्लागार समितीचे मुख्य, प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा असणार आहेत. तर आयोजनाची पूर्ण जबाबदारी विझं क्राफ्ट या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कंपनीकडे देण्यात आली आहे.

Mumbai Festival 2024
भव्य मुंबई फेस्टिवल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 10:32 PM IST

मुंबई Mumbai Festival 2024 : 20 ते 28 जानेवारी दरम्यान मुंबईत होणाऱ्या भव्य 'मुंबई फेस्टिवल'मध्ये मुंबईतील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करताना, पर्यटन मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नऊ दिवसीय महोत्सवामध्ये सर्वांना एकत्र आणण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव, संगीत, नृत्य आणि सिनेमा इव्हेंट्स, फूड फेस्टिव्हल सादर केले जातील. हा उत्सव मुंबईकरांच्या भावना आणि शहराच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसावर प्रकाश टाकणारा आहे. पर्यटनाला चालना देणे, विकास आणि सर्वसमावेशकता जोपासणे आणि उद्योगात नवीन संधी हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. 'म्युझिक फेस्ट, अर्थ मुव्ही कॉन्टेस्ट, बीच फेस्ट, मुंबई वॉक, टुरिझम कॉन्क्लेव्ह, सिनेमा फेस्ट, क्रिकेट क्लिनिक, महा शॉपिंग फेस्ट, महामुंबई एक्स्पो या उपक्रमांचा या फेस्ट‍िव्हलमध्ये समावेश आहे.

मुंबईच्या संस्कृतीचे होणार एकत्रित दर्शन : मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष महिंद्रा म्हणाले की, मुंबई फेस्टिव्हलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील स्टेक होल्डर्स एकत्र येत आहेत. हा फेस्टिव्हल एक वेगळा अनुभव देणारा आहे. या फेस्टिव्हलमुळं मुंबईच्या संस्कृतीचे एकत्रित दर्शन होईल. शिवाय सर्व मुंबईकरांना एकत्र आणण्यात या फेस्टिव्हलचा खूप मोठा वाटा असेल. मुंबई फेस्टिवल २०२४ च्या घोषणेनंतर मुंबई फेस्टिव्हलचा लोगो, ‘सपनो का गेटवे’ या थीमचे लोकार्पण करण्यात आलं, यानंतर संगीतकार टंडन यांनी रचलेल्या संकल्प गीताचे देखील लोकार्पण केलं गेलं.

वादग्रस्त वीज क्राफ्टकडे आयोजन : वीजक्राफ्ट या कंपनीकडे 'मेक इन इंडीया' या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली होती. यावेळी १४ फेब्रुवारी २०१६ ला गिरगाव चौपाटीवर झालेल्या महाराष्ट्र रजनी या कार्यक्रमदरम्यान मोठी आग लागली होती. त्यात एका व्यक्तीचा मृत्यु झाला होता. यानंतर या कंपनीविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. अजूनही प्रकरण मिटलं नसलं तरी आता पुन्हा त्याच कंपनीला मुंबई फेस्टीवलचं कंत्राट दिलं जात असल्यानं वाद सुरु झाला आहे. दरम्यान या कंपनीचे मालक सबास नवरोज यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रचंड गोंधळलेले सबास नवरोज यांनी विझक्राफ्ट नावाच्या अनेक कंपन्या आहेत. त्यापैकी एका कंपनीवर गुन्हा दाखल असेल असं उत्तर दिले. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही असं म्हणून नवरोज तिथून निघून गेले.

हेही वाचा -

  1. Eknath Shinde On Uddhav Tackeray : अन्यथा...'पाटणकर काढा' घेण्याची वेळ येईल, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
  2. Akola Riots : अकोल्यात दोन समाजाच्या गटामध्ये झालेली दंगल ही पूर्वनियोजित, गिरीष महाजनांना संशय
  3. JJ Hospital Financial Scam : जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी केली परदेश वारीवर उधळपट्टी; गिरीश महाजन म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.