ETV Bharat / state

Mumbai Crime : जेवणाच्या पार्सलवरून झालेल्या वादातून एकाची हत्या; आरोपींना अटक - हर्षद रवी बलोदा

Mumbai Crime : चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिअर बारमध्ये जेवणाच्या पार्सलवरून झालेल्या भांडणात एका तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी चेंबूर पोलिसांकडून दोन तरुणांना अटक करण्यात आलीय.

Mumbai Crime
जेवणाच्या पार्सलवरून झालेल्या वादातून एकाची हत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 10:42 AM IST

Updated : Oct 10, 2023, 11:27 AM IST

मुंबई Mumbai Crime : जेवणाच्या पार्सलवरून झालेल्या वादातून चेंबूर येथे एका २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले. अनिल रणदिवे असं मृत तरुणाचं नाव असून तो चेंबूरमधील सम्राट अशोक नगरचा रहिवासी होता. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी ऋतिक रमण बजाज (वय २३) आणि हर्षद रवी बलोदा (वय २७) या दोघांना अटक केली आहे. आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण : यासंदर्भात अधिक माहिती देत परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत म्हणाले की, 8 ऑक्टोबरला अनिल धरम रणदिवे नावाचा युवक चेंबूर येथील सन्निधी बार आणि रेस्टॉरंटमध्ये जेवणाचं पार्सल घेण्यासाठी गेला होता. तिथे हृतिक रमण बजाज आणि हर्षद रवी बलोदा हे देखील पार्सल घेण्यासाठीच उभे होते. तेव्हा पार्सल पहिले घेण्यावरून तिघांमध्ये वादंग निर्माण झाला. त्यावरून 'तू-तू मैं-मैं' झाल्याने वाद अजूनच चिघळला. वादाचे प्रमाण इतके वाढले की दोघांनी अनिलला मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला.

भावाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल : प्रत्यक्षदर्शींनी अनिलला दोघांच्या तावडीतून सोडवले. मात्र अनिल गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अनिलला मृत घोषित केले. त्यानंतर अनिलचा भाऊ सुनील रणदिवे (२३) याच्या तक्रारीवरून चेंबूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संविधान कलम ३०२ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ देसाई व पोलीस उपनिरीक्षक ओंकार म्हस्के व त्यांचे पथक करीत आहेत.

खबऱ्याच्या मदतीनं आरोपींंना पकडलं : दरम्यान, रविवारी रात्री सन्निधी बार अँड रेस्टॉरंटमधून पार्सल घेण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून अनिल रणदिवे या २२ वर्षीय तरुणाचा लाथाबुक्या मारून खून करणाऱ्या दोन्ही आरोपींना चेंबूर पोलिसांनी २४ तासांत अटक केली. अनिलच्या मृत्यूनंतर दोन्ही आरोपी फरार झाले. परंतु पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळताच दोघांना अटक करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ऋतिक आणि हर्षद हे दोघेही परदेशी कंपनीत काम करतात. एक दक्षिण आफ्रिकेत गारमेंटचा व्यवसाय करतो तर दुसरा अमेरिकेत वेटरचं काम करतो.

हेही वाचा -

  1. Six People Murdered in Deoria : उत्तर प्रदेश हादरलं! जुन्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्यासह 6 जणांची हत्या
  2. Manipur Violence : मणिपूरमध्ये तणाव वाढला, संतप्त आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर हल्ल्याचा प्रयत्न
  3. Thane Crime: दुर्गाडी पुलावरील डंपर चालकाच्या हत्येचा अखेर उलगडा, पळून जाणाऱ्या हल्लेखोरांना वांद्रे रेल्वे स्थानकातून अटक

Last Updated : Oct 10, 2023, 11:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.