मुंबई Mumbai Crime News : मुंबईतील नीरव महेंद्र खिमानी (Nirav Khimani) याने 2011 मध्ये विवाह नोंदनी ॲपवरून एका तरुणीशी ओळख केली. स्वतः विवाहित असून दुसऱ्या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून दहा वर्षे शरीर संबंध ठेवले. याबाबत बोरिवली न्यायालयात खटला दाखल झाला असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी (Police custody) सुनावलेली आहे. 15 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने आदेश जारी केले आहेत.
ॲपवरुन झाली ओळख : निरव महेंद्र खिमानी चारकोप कांदिवली येथील राहणाऱ्या तरुणाने बँकेत नोकरी करणाऱ्या तरुणीला विवाह नोंदणी ॲपवर ओळख करून फसवलं. निरव खिमानी सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट आहे. त्याने तिचा पत्ता हुडकत ओळख वाढवली. परंतु सुरुवातीला ती एका दुसऱ्या मित्राच्या रिलेशनशिपमध्ये होती. त्यामुळं तिने निरवची फ्रेंड रिक्वेस्ट रद्द केली. परंतु याने तिला 'विसरू शकत नाही असं म्हणत तिचा विश्वास संपादन केला. त्यानं सांगितलं की, त्याचा साखरपुडा रद्द झालेला आहे. त्यामुळं त्याला तिच्याशीच लग्न करायचं आहे. तिला त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर तिच्याशी त्यानं शरीर संबंध ठेवले होते. मात्र लग्न करण्याचं तो टाळत होता.
लोणावळ्याला लग्नाच्या बहाण्याने शरीर संबंध : एकदा 2017 साली जानेवारी मध्ये निरव खिमानी याने बोरिवली पश्चिम सागर दर्शन बिल्डिंग या ठिकाणी पार्टी करता पीडितेला नेले. तिथे लग्नाचं आमिष दाखवत शरीरसंबंध प्रस्थापित केला. यानंतर 9 डिसेंबर 2017 रोजी लोणावळा येथे देखील नेलं आणि तिथे देखील लग्नाचं आमिष दाखवून शरीर संबंध प्रस्थापित केला.
स्पाय ॲपने लॅपटॉप मोबाईलवर पाळत ठेवायचा : मुलीला त्याच्या सोशल मीडिया खात्यावरून एक मुलगा आणि भव्यता खिमानी यांचे फोटो पाहून 2022 मध्ये संशय आला. मात्र निरव याने तो भाचा असल्याचं सांगितलं. मात्र ती त्याची बायको आहे हे तरुणीला समजलं. नंतर निरव घटस्फोटित आहे असं त्या मुलीला खोटे सांगितलं. शिवाय तिचा मोबाईल लॅपटॉपवर देखील तो स्पाय ॲपद्वारे पाळत ठेवत होता. मात्र मुलीला संशय आला आणि चारकोप पोलीस ठाणे (Charkop Police Station) येथे गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी राजेंद्र कुंभार यांनी तपास करून गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपी नीरव खिमानी याला बोरिवली कोर्टात हजर केलं. यावेळी कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली. याबाबत पीडित तरुणीच्या बाजूने वकील प्रशांत पांडे यांनी बाजू मांडली.
हेही वाचा -
- MP High Court : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदी पतीकडून पत्नीला हवयं मुल, जामिनासाठी हायकोर्टात याचिका
- Mumbai HC On Rape Case : संमतीने लैंगिक संबंध कलम 376 नुसार बलात्कार नाही; मुंबई उच्च न्यायालयाकडून पुन्हा अधोरेखित
- Husband Killed House Servant: बायको राहिली गरोदर, नवऱ्याचा मात्र नोकरावरच संशय अन् केली त्याची हत्या