मुंबई Saregama India Ltd : नावात बरेच काही असतं, हे दाखवून देणारी बातमी आहे. सारखेच नाव-आडनाव असल्याचा गैरफायदा घेऊन फसवणूक करण्याचा प्रकरण उघडकीला आले.
विक्रम सुभाषचंद्र शहा बोरीवलीत राहत असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडं संयुक्तपणे 1999 पासून सारेगामा इंडिया लिमिटेडचे 6 हजार 430 फिसिकल शेअर्स आहेत. 2021 मध्ये त्यांनी शेअर ट्रान्सफर एजंटशी संपर्क साधला तेव्हा त्यांना कळालं की, त्यांचे काही शेअर्स इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (IEPF) मध्ये जमा करण्यात आले आहेत. तसंच या शेअर्सवर एका व्यक्तीनं दावा केल्याची माहितीही त्यांना मिळाली. त्यामुळं त्यांनी सुरुवातीला सेबी स्कोअरकडे तक्रार दाखल करण्यात आली. सेबी स्कोअरच्या चौकशीत असं समोर आलं की, विक्रम शंकरलाल शहा या अहमदाबाद, गुजरात येथे राहणाऱ्या व्यक्तीनं कंपनीच्या 23 लाख 85 हजार रुपयांच्या शेअर्सवर दावा केलाय.
आरोपीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी- बोरीवली पोलीस ठाण्यात 5 डिसेंबरला तक्रार दाखल झाल्यानंतर भारतीय दंड संविधान कलम आयपीसीच्या कलम 419, 420, 465, 467, 471 आणि 511अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 23 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक असल्यानं बोरीवली पोलिसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं गुरुवारी (7 डिसेंबर) अहमदाबादहून आरोपी विक्रम शहा याला अटक केली. तसंच आरोपीला शुक्रवारी (8 डिसेंबर) न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी दिलीय.
आरोपीला अटक : आरोपी विक्रम शंकरलाल शहा अहमदाबाद, गुजरात येथून व्यवसाय करत असल्याचं तपासादरम्यान समोर आलं. तसंच तक्रारदार आणि मूळ भागधारकाच्या नावाच्या समानतेचा चुकीचा वापर करून भागधारकाचं बनावट प्रतिज्ञापत्र करण्यात आलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक कन्हैया शिंदे, एएसआय शिवाजी वाळेकर आणि हेड कॉनस्टेबल अमित नार्वेकर यांनी अहमदाबाद येथे जाऊन आरोपी विक्रम शंकरलाल शहा याला त्याच्या कार्यालयातून अटक केली. दरम्यान, पोलीस निरीक्षक नितीन गिजे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा -