मुंबई - मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 12 ने काल सायंकाळी कुरार भागात छापा टाकला होता. या छाप्यात एका ड्रग तस्काराला अटक केली आहे. या आरोपीकडून 3 किलो 200 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. या जप्त केलेल्या चरसची किंमत 1 कोटी 2 लाख रुपये आहे.
मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई
मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 12ने मोठी कारवाई केली आहे. कुरार भागात छापा टाकून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. किशन गौर उर्फ साठे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याआधीही एका आरोपीला अटक केली होती. त्याला 26 किलो चरससह मुझफ्फरपूर येथे अटक झाली होती. त्याचा संबंध महाराष्ट्रात असल्याचे उघडकीस आले होते. मात्र त्यानंतर तो फरार झाला होता. किशन साठे हा चरस तस्करी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या म्हमून ओळखला जातो.
हेही वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष