ETV Bharat / state

Mumbai Crime News: साखर निर्यातीच्या नावाखाली परदेशातील व्यवसायिकाला 17 कोटींचा गंडा; तिघांना अटक - foreign businessman complaint

साखर निर्यात करण्याच्या नावाखाली महालक्ष्मी परिसरातील एका कंपनीच्या संचालकांनी साखर पुरवठा करण्याच्या आश्वासन देत परदेशातील एका व्यवसायीकाची 17 कोटींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी काशिनाथ जाधव आणि त्यांचा मुलगा पार्थ जाधव व कंपनीत काम करणारा विकास गायकवाड या तिघांना अटक केली आहे

Mumbai Crime News
निर्यातीच्या नावाखाली परदेशातील व्यवसायिकाची फसवणूक
author img

By

Published : Jul 7, 2023, 10:04 AM IST

Updated : Jul 7, 2023, 1:49 PM IST

मुंबई : दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटनांचे नवीन प्रकार समोर येत आहे. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. त्यात मूळचे दिल्लीचे रहिवासी असलेले तक्रारदार अमीर अली यांचा इम्पोर्ट एक्स्पोर्टचा बिजनेस आहे. व्यवसायाच्या माध्यमातून किर्गीझस्तान येथील रहिवासी इसकेंदर उल्लो यांच्याशी त्यांची ओळख झाली. उल्लो यांची अल्प इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड नावाची भारतात कंपनी आहे. उल्लू आणि अमीर यांच्या कंपनीची कार्यालय एकाच इमारतीत आहेत. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात उल्लो याने अमीर यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या देशात मोठ्या प्रमाणात साखरेची कमतरता आहे. त्यांच्या ओळखीच्या जुमान्झराव कोचकोरबेक यांची के.जी. इन्वेस्ट कंपनी आहे. त्यांना तात्काळ 12000 मेट्रिक टन साखर खरेदी करायची असल्याचे सांगितले.

साखर निर्यातदारांची माहिती : त्याचप्रमाणे पुरवठा करणाऱ्या कंपनीची माहिती घेण्यास सांगताच त्यांनी अमीर यांची हरियाणामधील रोहित शर्माच्या ओळखीतून मुंबईतील किशोर आणि काशिनाथ जाधव या दोन साखर निर्यातदारांची माहिती दिली. काशिनाथ जाधव यांची रॉयल ऍग्रो मार्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. त्यानुसार किशोर आणि काशिनाथ यांना साखरेची ऑर्डर देण्यात आली. 12 हजार मॅट्रिक टन साखरेचे ऑर्डर देत ठरल्याप्रमाणे ॲडव्हान्स म्हणून 24 कोटी रुपये रक्कम जाधव यांच्या कंपनीच्या खात्यावर पाठवली.

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल : मात्र, वेळेत साखर न मिळाल्याने त्यांनी ऑर्डर रद्द केली. पैसे परत पाठवण्यास सांगताच त्यांनी फक्त सात कोटी परत पाठवले. उर्वरित 17 कोटी न पाठवल्याने अखेर अमिर आणि उल्लो यांनी ॲडिशनल डायरेक्टर ऑफ फॉरेन ट्रेड मुंबई येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार समितीने त्यांना पैसे परत करण्यास सांगूनही त्यांनी पैसे परत केले नाहीत. त्यानंतर या संदर्भात स्थानिक पोलीस स्टेशन असलेल्या एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

.

हेही वाचा :

  1. Bhandara Crime: क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल
  2. Fake Bank Employee Arrested: बँक कर्मचारी असल्याचे भासवत ग्राहकांना लुटले, 49 गुन्हे करणाऱ्यांना अटक
  3. Job Fraud In Pune: भारतीय लष्करात नोकरी लावून देतो असे सांगत तरुणाची २८ लाख रुपयांची फसवणूक
Last Updated : Jul 7, 2023, 1:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.