ETV Bharat / state

Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णसंख्या ३०० च्या वर, २ मृत्यूची नोंद - Active Corona Patients

मुंबईत जूननंतर कोरोनाच्या (Mumbai Corona Update) रुग्णांच्या संख्येत घट (Decrease in patient) दिसून आली. रुग्णसंख्या ३०० च्या खाली नोंद होत होती. आज त्यात किंचित वाढ होऊन ३२२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर २ मृत्यूची नोंद झाली (2 deaths reported) आहे. सध्या १९५ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत.

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 31, 2022, 7:25 PM IST

मुंबई: मुंबईत गेल्या २४ तासात १३ हजार ४३३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३२२ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज २ मृत्यूंची नोंद झाली (2 deaths reported) आहे. २३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २४ हजार ८१३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३ हजार २६१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ९०१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३०४९ दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२३ टक्के आहे.

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली.

जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून १६ जूनला २३६६, २३ जूनला २४७९, ३० जुनला १२६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १ जुलैला ९७८, २ जुलैला ८११, ३ जुलैला ७६१, ४ जुलैला ४३१,५ जुलैला ६५९, ६ जुलैला ६९५, ७ जुलैला ५४०, ८ जुलैला ५३०, ९ जुलैला ४९९, १० जुलैला ३९९, ११ जुलैला २३५, १२ जुलैला ४२०, १३ जुलैला ३८३, १४ जुलैला ३३९, १५ जुलैला ३६५, १६ जुलैला २८२, १७ जुलैला २७६, १८ जुलैला १६७, १९ जुलैला २८४, २० जुलैला २९०, २१ जुलैला २७३, २२ जुलैला २९९, २३ जुलैला २६६, २४ जुलैला २३८, २५ जुलैला १७६, २६ जुलैला २६३, २९ जुलैला २९०, ३० जुलै २८६, ३१ जुलैला ३२२ रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा तर जुलै महिन्यात ६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा : WHAT IS ED : भल्या भल्यांना धडकी भरवणारी काय आहे 'ईडी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.