मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज मुंबईत कोरोनाच्या 2 हजार 109 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर आज 2 हजार 347 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत आज (रविवारी) कोरोनाचे 2 हजार 109 नवे रुग्ण आढळून आले असून 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 38 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 31 पुरुष तर 17 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 14 हजार 445 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 105 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 2347 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 76 हजार 17 वर गेला आहे. सध्या मुंबईत 28 हजार 904 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 64 दिवस तर सरासरी दर 1.09 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 673 चाळी आणि झोपडपट्टी कंटेनमेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 210 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत, तर कोरोनाचे निदान करण्यासाठी 11 लाख 68 हजार 348 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.