ETV Bharat / state

पर्यटन कंपन्यांविरोधात मुंबई ग्राहक पंचायतीचे आक्रमक पाऊल; परताव्याबाबत ऑनलाईन सर्वेक्षण

author img

By

Published : Jun 18, 2020, 7:49 AM IST

मुंबई ग्राहक पंचायतीने‌ एक ऑनलाईन सर्वेक्षण हाती घेतले आहे. ज्या पर्यटकांच्या देशांतर्गत वा परदेश सहली टाळेबंदीमुळे रद्द झालेल्या असतील त्यांना सहल‌ कंपन्या त्यांचे पैसे परत करत आहेत किंवा अन्य काही पर्याय पर्यटकांना देत आहेत का? तसेच हे करताना त्यातून काही रकमा कापून घेत आहेत का? हे जाणून घेण्यासाठी प्रवाशांकडून यासंबंधीची माहिती या सर्वेक्षणातून मागवली आहे.

Mumbai Consumer Panchayat
पर्यटन कंपन्यांविरोधात मुंबई ग्राहक पंचायतीचे आक्रमक पाऊल; परताव्याबाबत ऑनलाईन सर्वेक्षण

मुंबई - कोरोनामुळे देशभर २५ मार्च नंतरच्या देशांतर्गत वा विदेशी पर्यटन सहलींसाठी ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते, त्या प्रवाशांना परतावा नाकारणाऱ्या पर्यटन कंपन्यांविरोधात मुंबई ग्राहक पंचायतीने आक्रमक पाऊल उचलले आहे. त्यानुसार पर्यटन सहलींवरील परताव्याबाबत मुंबई ग्राहक पंचायतीकडून ऑनलाईन सर्वेक्षण केले जाणार आहे. हे सर्वेक्षण बुधवार, २४ जून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन उपलब्ध असेल. तरी सर्व संबंधित ग्राहकांनी या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीने केले आहे.

मुंबई ग्राहक पंचायतीने‌ एक ऑनलाईन सर्वेक्षण हाती घेतले आहे. ज्या पर्यटकांच्या देशांतर्गत वा परदेश सहली टाळेबंदीमुळे रद्द झालेल्या असतील त्यांना सहल‌ कंपन्या त्यांचे पैसे परत करत आहेत किंवा अन्य काही पर्याय पर्यटकांना देत आहेत का? तसेच हे करताना त्यातून काही रकमा कापून घेत आहेत का? हे जाणून घेण्यासाठी पर्यटक, प्रवाशांकडून यासंबंधीची माहिती या सर्वेक्षणातून मागवली आहे. सर्वेक्षणातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे संबंधित सरकारी यंत्रणेकडे याबाबत ग्राहकांना न्याय मिळवुन देण्यासाठी शासनाने सर्व पर्यटन कंपन्यांना मार्गदर्शक सूचना द्याव्यात यासाठी मुंबई ग्राहक पंचायत आग्रह धरणार आहे.

कोरोनामुळे देशभर २५ मार्च पासुन टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे देशातील आणि परदेशात जाणारी हवाई सेवासुद्धा ठप्प झाली. २५ मार्च नंतरच्या देशांतर्गत वा विदेशी पर्यटन सहलींसाठी ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते. त्या प्रवाशांना साहजिकच या सहली रद्द झाल्यामुळे आपल्या रकमेचा परतावा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक सहल कंपन्यांनी सरकारी आदेशामुळे सहली रद्द कराव्या लागल्याचे कारण पुढे करत प्रवाशांना परतावा नाकारला आहे. काही कंपन्यांनी या रकमेच्या परताव्याऐवजी क्रेडिट कूपन प्रवाशांना देऊ केले असून हे कूपन येत्या ६ ते १२ महिन्यांत त्यांच्या सहलींसाठी वापरू शकतील असे कळवले आहे. परंतु त्यातही काही रक्कम कापून घ्यायचे या कंपन्यांनी परस्पर ठरवल्याचा आरोप ग्राहक पंचायतीने केला आहे.

प्रवाशांनी सहभागी कसे व्हावे?

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfo-yXDyON3v5YM94wB3oiivyR4_2uqvhctSG3aYRc0ukhj_Q/viewform?vc=0&c=0&w=1
या लिंकवर जाऊन सर्वेक्षणात सहभागी व्हावे. अथवा मुंबई ग्राहक पंचायतीच्या www.mymgp.org या संकेतस्थळावर जाऊन सर्वेक्षणाची प्रश्नावली भरावी असे आवाहन कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.