ETV Bharat / state

मुंबई महापालिका हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे १६ प्रकल्प उभारणार - Mumbai oxygen plant news

मुंबई महापालिका प्रशासनाने कायमस्‍वरुपी ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून १२ रुग्‍णालयांमध्‍ये १६ ऑक्सिजन प्‍लांट उभारण्‍याचा निर्णय घेतला आहे. वातावरणातील हवेतून ऑक्सिजन निर्माण करुन तो रुग्‍णांना पुरवण्‍यात येईल. या सर्व १६ प्रकल्‍पांतून प्रतिदिन एकूण ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होणार आहे. या १६ प्रकल्‍पांचा एकूण खर्च अंदाजे ९० कोटी रुपये इतका अपेक्षित आहे.

Mumbai
Mumbai
author img

By

Published : Apr 24, 2021, 1:58 PM IST

मुंबई : कोरोना रुग्णसंख्येत झालेल्या वाढीनंतर ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. ऑक्सिजन पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, महापालिका प्रशासनाने कायमस्‍वरुपी ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून १२ रुग्‍णालयांमध्‍ये १६ ऑक्सिजन प्‍लांट उभारण्‍याचा निर्णय घेतला आहे. वातावरणातील हवेतून ऑक्सिजन निर्माण करुन तो रुग्‍णांना पुरवण्‍यात येईल. या सर्व १६ प्रकल्‍पांतून प्रतिदिन एकूण ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होणार आहे. या १६ प्रकल्‍पांचा एकूण खर्च अंदाजे ९० कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून यामुळे पालिकेची बचत होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

ऑक्सिजनचा तुटवडा -

मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. प्राणवायू पुरवठ्याअभावी १६८ कोविड रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरीत करावे लागले आहे. ऑक्सिजन उपलब्‍ध करुन देताना होणारी कसरत पाहता प्रशासनाने पालिकेच्‍या रुग्‍णालयांमध्‍ये स्‍वतःचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्‍प उभारण्‍याचे ठरवले आहे. यामुळे ऑक्सिजन उपलब्‍धतेतील अडथळे कमी होतील असे पालिका आयुक्तांनी म्हटले आहे.

हे प्रकल्‍प किमान १५ वर्षे ते कमाल ३० वर्षे संचालित होवू शकतात. परिणामी महानगरपालिकेच्‍या आर्थिक खर्चात बचत करण्‍यासाठी देखील हे प्रकल्‍प अत्‍यंत उपयुक्‍त ठरणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.

या दोन ठिकाणी प्रकल्प आहे सुरू -
बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात प्रतिदिन सुमारे ५०० घनमीटर म्हणजेच क्‍युबिक मीटर क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्‍प उभारला आहे. तर जोगेश्‍वरीतील हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयामध्ये देखील वर्षभरापूर्वी प्रतिदिन १ हजार ७४० घनमीटर म्हणजेच क्‍युबिक मीटर क्षमतेचा प्रकल्‍प उभारला आहे. या दोन्‍ही रुग्‍णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्‍प व्यवस्थित कार्यरत असून कोविड-१९ संसर्गाच्‍या काळात अत्यंत मोलाचे ठरत आहेत. हे दोन्‍ही प्रकल्‍प वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्मिती या तंत्रावर आधारीत आहेत. ऑक्सिजन सिलिंडर सांभाळण्याची व भरण्याची दगदग राहणार नाही. परिणामी यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

असा तयार होणार ऑक्सिजन -
• हवेत आधीच ऑक्सिजन असताना पुन्‍हा तो शोषून नव्‍याने ऑक्सिजन कसा तयार केला जातो, याचे कुतूहल असणे स्‍वाभाव‍िक आहे.
• वातावरणातील हवा शोषून, पी.एस.ए. (pressure swing adsorption) तंत्राचा वापर करुन रुग्‍णांना ऑक्सिजन पुरवठा करताना, सर्वप्रथम संयंत्रांमध्‍ये योग्‍य दाबाने हवा संकलित (कॉम्‍प्रेस) केली जाते.
• त्‍यानंतर ती हवा शुद्ध (फ‍िल्‍टर) करण्‍यात येते. त्‍यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल/इंधन यांचे अतिसूक्ष्‍म कण, इतर अयोग्‍य घटक गाळून वेगळे केले जातात.
• या प्रक्र‍ियेनंतर उपलब्‍ध झालेली शुद्ध हवा 'ऑक्‍स‍िजन जनरेटर' मध्‍ये संकलित केली जाते. ऑक्‍स‍िजन जनरेटर मध्‍ये असलेल्‍या झि‍ओलीट (Zeolit) या रसायनयुक्‍त मिश्रणाद्वारे या शुद्ध हवेतून नायट्रोजन व ऑक्‍स‍िजन हे दोन्‍ही वायू वेगळे केले जातात.
• वेगळा करण्‍यात आलेला ऑक्‍स‍िजन हा योग्‍य दाबासह स्‍वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो वाहि‍न्‍या/पाईपद्वारे रुग्‍णांपर्यंत पोहोचवला जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.