मुंबई : भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेने ( Central Railway )सात महिने अर्थात एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ४३.९७ दशलक्ष टन मालवाहतूक केली. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या याच कालावधीच्या तुलनेत ७.१९% हि वाढ असून, गेल्या वर्षी याच कालावधीत मालवाहतूक ४१.०२ दशलक्ष टन होती. मध्य रेल्वेची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असल्याचे, महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी ( General Manager Anil Kumar Lahoti ) यांनी सांगितले.
सात महिन्याच्या मालवाहतुकीत वाढ - रेल्वेचे जाळे सर्वदूर पसरलेले आहे. त्यामुळे रेल्वेची वाहतूक सोयीची होते. अर्थात अद्याप काही भागात माल वाहतूक सोय परिपुर्ण रीतीने सुरु नाही . मात्र जिथे आहे तेथील मालवाहतूक अधिक प्रभावीपणे केल्यास त्याचा प्रत्यय मागील सात महिन्याच्या मालवाहतुकीत वाढ होताना दिसत आहे. ऑक्टोबर २०२१ च्या तुलनेत ऑक्टोबर- २०२२ मध्ये नक्त टन किलोमीटर (NTKMs) ७.३% नी वाढले आणि ऑक्टोबर २०२१ च्या तुलनेत ऑक्टोबर २०२२ मध्ये एकंदरीत १०.७% वाढ आहे. मालवाहतुकीच्या महसूलाच्या बाबतीत, मध्य रेल्वेने ऑक्टोबर २०२१ मधील रु. ५८४.५५ कोटी वरून ऑक्टोबर २०२२ मध्ये रु. ६३५.८७ कोटी म्हणजे ८.७८% वाढ मिळवली आहे.
आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी - ऑक्टोबर २०२१ मधील कंटेनरच्या ६७९ रेकच्या तुलनेत मध्य रेल्वेने ऑक्टोबर २०२२ मध्ये कंटेनरचे ७४८ रेक लोड केले. ऑक्टोबर २०२१ मध्ये लोडिंग केलेल्या लोह आणि स्टीलच्या ९० रेकच्या तुलनेत ऑक्टोबर २०२२ मध्ये १३९ रेक लोडिंग केले गेले. ऑक्टोबर २०२१ मध्ये लोड केलेल्या १६० रेकच्या तुलनेत ऑक्टोबर २०२२ मध्ये पेट्रोलियम उत्पादनांचे १८० रेक लोड केले गेले. गेल्या वर्षीच्या याच महिन्यात १०७ रेकच्या तुलनेत ऑक्टोबर २०२२ मध्ये खताचे ११६ रेक लोड केले गेले.
पायाभूत सुविधांच्या सुधारणांसह विकास - नागपूर विभागाने ऑक्टोबर २०२२ मध्ये बल्हारशाह येथून लोहखनिजाचे ३६ रेक लोड केले जेव्हा ऑक्टोबर २०२१ मध्ये एकही रेक नव्हते. मालवाहतुकीत वाढ ही मध्य रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या सुधारणांसह मध्य रेल्वेने घेतलेल्या व्यवसाय विकासाच्या अनेक उपक्रमांमुळे झाली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये लोड केलेल्या १६० रेकच्या तुलनेत ऑक्टोबर २०२२ मध्ये पेट्रोलियम उत्पादनांचे १८० रेक लोड केले गेले. गेल्या वर्षीच्या याच महिन्यात १०७ रेकच्या तुलनेत ऑक्टोबर २०२२ मध्ये खताचे ११६ रेक लोड केले गेले असल्याचे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले.