ETV Bharat / state

मुंबईतील तळीरामांसाठी 'गुड न्यूज', कंटेटमेंट झोन वगळता दारू मिळणार घरपोच - मुंबईत ऑनलाईन दारू विक्री

लॉकडाऊनमुळे दारू न मिळालेल्या मुंबईतील दारूप्रेमींसाठी चांगली बातमी आहे. कंटेनमेंट झोन वगळता आता संपूर्ण मुंबईत दारू घरपोच मिळणार आहे.

liquor home delivery in Mumbai
मुंबईतील तळीरामांसाठी 'गुड न्यूज', कंटेटमेंट झोन वगळता दारू मिळणार घरपोच
author img

By

Published : May 22, 2020, 8:33 PM IST

मुंबई - लॉकडाऊनमुळे दारू न मिळालेल्या मुंबईतील दारूप्रेमींसाठी चांगली बातमी आहे. कंटेनमेंट झोन वगळता आता संपूर्ण मुंबईत दारू घरपोच मिळणार आहे. मुंबई महापालिकेने आज (शुक्रवार) यासंदर्भात पत्रक काढले आहे. पण दारूसाठी मद्य परवाना आवश्यक आहे.

देशात 22 मार्चपासून आजघडीपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. मुंबई कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट ठरल्याने, याचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेचीच दुकाने सुरू आहेत. लॉकडाऊनदरम्यान सर्व आर्थिक व्यवहार थांबल्याने सरकारचा महसूलही बंद आहे. त्यासाठी राज्य सरकारने 11 मे रोजी एक परिपत्रक काढून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने तसेच दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र मुंबईकरांनी कोणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंग न ठेवता दारूच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. यामुळे पालिकेने दोनच दिवसात हे परिपत्रक मागे घेतले आणि दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला.
आता पुन्हा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार कंटेनमेंट झोन वगळता दारूची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी दारू पिण्याचा परवाना आवश्यक असणार आहे. हा परवाना असलेल्या व्यक्तीला त्याच्या घरी घरपोच दारू मिळणार आहे. दुकानदारांना दुकानात दारू विकता येणार नाही. पण दारू घरपोच देण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या कंपन्यांची मदत घ्यावी लागणार आहे. घरपोच डिलीव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून दारू घरपोच मिळणार आहे.
असा मिळवा परवाना
दारू पिण्यासाठी राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाचा परवाना आवश्यक असतो. सध्या हा परवाना ऑनलाइन दिला जात आहे. एका दिवसासाठी 100 रुपये तर लाईफटाइमसाठी 1100 रुपयात हा परवाना उपलब्ध आहे. उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा परवाना ऑफलाईनही मिळू शकणार आहे.
अत्यावश्यक नसलेली दुकानेही सुरू राहणार -
मुंबईत गेले दोन महिने अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू आहेत. आता अत्यावश्यक सेवा नसलेली एकाच रस्त्यावरील पाच दुकाने उघडता येणार आहेत.

हेही वाचा - भाजपच्या 'मेरा आंगण मेरा रणांगण'ला नेटिझन्सचे प्रत्युत्तर; '#महाराष्ट्रद्रोहीBJP' हॅशटॅग ट्रेंडमध्ये

हेही वाचा - मंत्रालयावर कोरोनाचे संकट कायम, आता प्रधान सचिवालाच कोरोनाची बाधा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.