मुंबई : Mumbai Air Pollution : शहरातील वाढत्या बांधकामांमुळं हवेचं प्रदूषण वाढलं आहे. यामुळं बृहन्मुंबई महानगरपालिका हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. मुंबईत वाहनांवर बसवण्यासाठी 'अँटी स्मॉग गन' आणण्याचा पालिकेचा विचार आहे. त्यानुसार ३० युनिट अँटी स्मॉग गन खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर शहरातील हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. मंगळवारी उपनगरातील अनेक भागांमध्ये खराब हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला. सर्वात खराब हवा ही अंधेरी आणि माझगाव परिसरात असल्याचं दिसून आलं.
अँटी-स्मॉग गन खरेदीचा निर्णय : मुंबईत बांधकाम व्यवसायात वाढ झाली आहे, त्यामुळं वायू प्रदूषण होतं असल्याचं म्हटल होतं. धुळीच्या कणांचा बंदोबस्त करण्यासाठी पाणी शिंपडावं लागत आहे. दिल्लीतून सूचना घेऊन 'आम्ही पाणी वापरण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती. त्यानुसार आता मुंबईत वाहनांवर 'अँटी स्मॉग गन' बसवण्यात आल्या आहेत. अँटी-स्मॉग गन ही वाहन-माऊंट केलेल्या पाण्याच्या टाकीला जोडलेली एक प्रोपेलर बंदूक आहे, जी सूक्ष्म नेब्युलाइज्ड पाण्याचे थेंब उत्सर्जित करते. जे लहान धुळीचे कण शोषून घेतात. हे उच्च-दाब प्रोपेलर वापरून 50-100 मायक्रॉनच्या थेंबाच्या आकारासह पाण्याचे बारीक स्प्रेमध्ये रूपांतरित करण्यासाठी डिझाइन केलेलं आहे.
...अन्यथा कारवाई : मुंबई शहरात सध्याच्या घडीला 6 हजार ठिकाणी बांधकाम सुरू आहेत. या सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा अशा बांधकामांना रोखण्यात येईल, असा सक्त इशारा महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे. धूळ प्रदूषण नियंत्रणाची नवीन मार्गदर्शक तत्त्वे सोमवार, 22 ऑक्टोबर 2023 पर्यंत जारी करण्यात येतील. त्यांचं पालन सर्व घटकांनी, यंत्रणांनी करणं आवश्यक राहील. पालन न करणाऱ्यावर कारवाई केली जाईल, अशी सूचना इकबाल सिंह चहल यांनी केली आहे.
कारवाईसाठी पालिकेचा टास्क फोर्स : बांधकामांमुळं होणारं धुळीचं प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेनं एक 7 सदस्यांची कमिटी तयार केलीय. या कमिटीनं एक योजना जाहीर केली आहे. त्या योजनेला मुंबई 'वायू प्रदूषण नियंत्रण योजना' असं नाव देण्यात आलंय. सोबतच सर्व बांधकाम व्यावसायिकांना पालिकेनं जाहीर केलेल्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेनं एक टास्क फोर्स देखील तयार केली आहे.
हेही वाचा -
- Mumbai Air Quality Index : मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ; आजार बळवण्याची शक्यता, 'अशी' घ्या काळजी
- G२० Delhi Pollution : काय सांगता! जी २० मुळे दिल्लीतील हवा झाली स्वच्छ, कसं काय जाणून घ्या
- Ajit Pawar VS Sharad Pawar : रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई; शरद पवार गट आक्रमक, आगामी निवडणुकीत 'रिटर्न गिफ्ट' देण्याचा इशारा