मुंबई : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशन मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे पॅकेज सी-1 साठी 28 डिसेंबर 2022 रोजी आर्थिक बोली उघडण्यात आली. बीकेसी स्टेशन आणि शिळफाटा दरम्यान दुहेरी मार्गासाठी बोगद्याचे बांधकाम अंदाजे 21 किमी आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी निविदा मागवण्यात आली होती. नागरी आणि इमारतीची कामे ज्यामध्ये व्हायाडक्ट, पूल, बोगदा, देखभाल डेपो यांचा समावेश होतो. स्टेशनचे म्हणजे, ठाणे, विरार, बोईसर आणि ठाणे डेपोसाठी गुजरात महाराष्ट्र सीमेवरील शिळफाटा आणि झरोली गावादरम्यान काही जोडणीची कामे १३५ किमी अंतरासाठी पॅकेज सी-3 ह्या वर्षी मार्च २०२३ अखेरपर्यंन्त होईल.
बांधकामाचे काम जोरात सुरू : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय गतिशक्ती महामंडळाने दिलेला माहितीनुसार, महाराष्ट्रात गुजरातमध्ये भूसंपादनाची ताजी स्थिती पुढीलप्रमाणे आहे. एकूण भूसंपादन 98.87 टक्के गुजरातमध्ये, 98.91 दादर नागरा हवेली डीएनएच, 100 टक्के तर महाराष्ट्रात 98.76 टक्के गुजरात आणि डीएनएचमधील 8 जिल्ह्यांमधून जाणार्या संपूर्ण 352 किलोमीटर संरेखनासाठी व्हायाडक्ट, पूल, स्टेशन आणि ट्रॅकच्या बांधकामासाठी नागरी, पूल आणि ट्रॅकसाठी 100 टक्के कंत्राटे 2 वर्षांच्या कालावधीत देण्यात आली आहेत. गुजरात आणि डीएनएचमधील 8 जिल्ह्यांमधून जाणार्या संरेखनात बांधकामाचे काम जोरात सुरू झाले आहे.
नद्यांवर पुलाचे काम प्रगतीपथावर : सुरत आणि आनंद एचएसआर स्टेशनवर प्रत्येकी 50 मीटरचा पहिला रेल्वे स्तर स्लॅब टाकण्यात आला आहे. 27.6 किमीचे व्हायाडक्ट पूर्ण झाले आहे. ज्यामध्ये वडोदराजवळील 6.28 किमी अखंड व्हायाडक्ट आणि वेगवेगळ्या ठिकाणी उभारलेल्या 21.32 किमीचा समावेश आहे. वापी ते साबरमतीपर्यंत 8 एचएसआर स्टेशनवरील कामे बांधकामाच्या विविध टप्प्यांत आहेत. 240.37 किमी लांबीचा ढीग टाकण्यात आला आहे. 158.89 किमीपेक्षा जास्त फाउंडेशन आणि 137.89 किमी लांबीवर पिअर्स बांधण्यात आले आहेत. गर्डर कास्टिंगमध्ये 1175 गर्डरची संख्या 47 किमी पर्यंत जोडली गेली आहे. नर्मदा, ताप्ती, माही आणि साबरमती या महत्त्वाच्या नद्यांवर पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.
बुलेट ट्रेनच्या कामा संदर्भातल्या निविदा : यासंदर्भात राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळाच्या प्रवक्त्या सुषमा गौर यांच्यासोबत ईटीव्हीने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, जपान इंटरनॅशनल कोओपरेशन एजन्सी जायकाकडे यासंदर्भातल्या दस्तावेजाच्या प्रक्रिया आम्ही पूर्ण केल्या आहेत. त्या लवकरच मान्य होण्याचे संकेत मिळालेले आहे. 9 फेब्रुवारी 2023 रोजी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स याच्या निविदा या उघडल्या जातील. त्यानंतर कामाला सुरुवात होईल, तर महाराष्ट्रामधील बुलेट ट्रेनच्या कामा संदर्भातल्या निविदा या 2023 मध्ये पूर्ण होतील.
विविध बांधकाम स्थळांना भेट : जपानच्या पंतप्रधानांचे विशेष सल्लागार डॉ. मासाफुमी मोरी आणि जपानमधील वरिष्ठ अधिकारी श्री राजेंद्र प्रसाद, यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय जपानी शिष्टमंडळाने सुरत स्टेशन, फुल स्पॅन गर्डर आणि एसबीएससह विविध बांधकाम स्थळांना भेट दिली. कास्टिंग यार्ड आणि व्हायाडक्ट कामे पाहणी केली. भारतातील जपानचे राजदूत आणि सरकारचे वरिष्ठ अधिकारी होते.