ETV Bharat / state

Bullet Train BKC Station : बीकेसीवर बुलेट ट्रेनच्या कामाला गती; बांधकामासाठी 19 जूनला निविदा काढणार

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बीकेसीवरील इमारतींच्या कामाला ही गती मिळाली असून भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया ही जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे बीकेसीतील स्टेशनच्या बांधकामासाठी 19 मे आणि 7 जूनला विविध साहित्य करिता निविदा काढण्यात येणार आहेत. 30 ऑगस्ट 2023 पर्यंत बीकेसीवरील स्टेशनचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मेट्रो कार्पोरेशन ठेवल्याची माहिती, मेट्रो कार्पोरेशनच्या राष्ट्रीय प्रवक्त्या रेश्मा गौर यांनी दिली.

Bullet Train
बुलेट ट्रेनच्या कामाला गती
author img

By

Published : Jun 1, 2023, 7:21 PM IST

माहीती देताना आमदार संजय शिरसाट

मुंबई: मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सूरत ते बिलीमोरा हा पहिला टप्पा 2026 पर्यंत सुरु केला जाणार आहे. हायस्पीड असा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प असणार आहे. मुंबईतील बिकेसीवर बुलेट ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड या खासगी कंपन्यांना भागीदारीत हे काम दिले आहे. मुंबई बीकेसी ते साबरमती या दरम्यान एकमेव अंडरग्राउंड स्टेशन असणार आहे. हिंदुस्तान कंस्ट्रक्शन कंपनी आणि मॅसर्स एमईआयएल या दोन कंपन्या हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या स्टेशनची निर्मिती करतील. आतापर्यंत मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाद्वारे 61.3 किमी, वडोदराजवळील 12.6 किमी मार्गाचे पूर्ण झाले आहे. सतत मार्ग आणि इतर ठिकाणी 48.7 किमीचे बांधकाम समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार ऑक्टोबर 2022 ते मे 2023 पर्यंत 50 किलोमीटरच्या मार्गिका बांधण्याचे उल्लेखनीय कामगिरी सरकारने केल्याचे राष्ट्रीय प्रवक्त्या रेश्मा गौर यांनी स्पष्ट केले.

निविदा प्रक्रिया सुरू: बीकेसीवरील स्टेशनच्या सिव्हिल, हॉर्टिकल्चर, इलेक्ट्रिकल, एसअँडटी, एमईपी यासह इमारतींच्या अंतर्गत बांधकामांसाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. तर निविदा पाठवण्यासाठी 19 जून 2023 मुदत दिली आहे. तर कटिंग साहित्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून 7 जूनला निविदांची अंतिम मुदत असणार आहे. तसेच डिझाईनचे कोरीवकाम, एकरकमी किंमतीच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यासाठी डिझाईन, निर्मिती, पुरवठा आणि चाचणी आणि कमिशनिंगची कालमर्यादा 30 ऑगस्ट 2023 पर्यंत राखीव ठेवल्याचे कौर यांनी सांगितले.

Bullet Train
बीकेसीवर बुलेट ट्रेनच्या कामाला गती

बीकेसीवरील स्टेशन असे असेल: बीकेसीवर उभारण्यात येणाऱ्या स्टेशनची एकूण उंची 60 मीटर इतकी असून, 24 मीटर जमिनीखालून बुलेट ट्रेन धावणार आहे. बीकेसी स्टेशनच्या प्रवेशद्वारावर अरबी समुद्राचे चित्रण रेखाटली जाणार आहे. आकाश, ढग आणि उसळणाऱ्या लाटांचे फोटो या थीम मध्ये असतील. तळमजला अधिक चार मजल्याची स्टेशनची इमारत असेल. तळ मजल्यावर प्रवेश, सुरक्षा रक्षक, तपासणीसाठी स्कॅनिंग मशीन लावण्यात येणार आहेत. पहिल्या मजल्यावर काही साहित्यासाठी राखीव खोल्या असतील. दुसऱ्या मजल्यावर बिजनेस तिकिट ऑफिस, क्लास लाउंज, कस्टमर केअर कमर्शिअल शॉप असेल. तर शेवटच्या फ्लोअरवर स्टेशन परिसर, प्लॅटफॉर्म आणि सर्विस रुम बांधण्यात येणार आहेत.

Bullet Train
बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल माहिती

लवकरच बुलेट ट्रेन धावणार: बुलेट ट्रेनचे काम यापूर्वी सुरू व्हायला हवे होते. परंतु काही राजकीय लोकांच्या हट्टापायी हे काम थांबले होते. जवळपास दहा हजार कोटीचा फटका यामुळे सरकारला बसला आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्याला गती दिल्याने आता काम सुरू झाले आहे. बुलेट ट्रेन मार्गात अडथळे होते, ते सुद्धा काढून टाकले आहेत. त्यामुळे आता कामाला वेग येईल. सुनिश्चित कालावधी प्रकल्प पूर्ण होऊन लवकरच बुलेट ट्रेन धावेल, असा विश्वास शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

Bullet Train
बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल माहिती
बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल अधिक माहिती: 30 मे 2023 पर्यंतची स्थिती अशी आहे. 303 किमी. 238 किलोमीटर लांबीचे ढिगारे टाकण्यात आले आहे. 198 किमी पेक्षा जास्त पायाच्या लांबीमध्ये पिअर्स बांधण्यात आले आहेत. गर्डर कास्टिंग 2178 गर्डर आणि 87.1 किमी ओव्हरच्या लांबीमध्ये टाकले गेले आहेत. गुजरात आणि DNH मधील 8 जिल्ह्यांतून जाणाऱ्या मार्गावरील बांधकामाचे काम जोरात सुरू आहे. वापी ते साबरमतीपर्यंत 8 एचएसआर स्थानकांचे बांधकाम विविध टप्प्यात आहे. आनंद/नडियाड एचएसआर स्टेशन हे MAHSR कॉरिडॉरवरील पहिले स्टेशन आहे जिथे कॉन्कोर्स लेव्हल (स्टेशनचा पहिला स्तर) पूर्ण झाला आहे. या स्थानकावर 425 मीटर लांबीच्या कंकोर्स लेव्हलचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सुरत, आनंद आणि बिलीमोरा HSR स्टेशनवर रेल्वे स्तरावरील स्लॅबचे कास्टिंग सुरू झाले आहे.नर्मदा, ताप्ती, माही आणि साबरमती या महत्त्वाच्या नद्यांवर पुलाचे काम सुरू आहे. पार नदीवरील पहिला नदी पूल जानेवारी 2023 मध्ये पूर्ण झाला आहे. HSR ट्रॅक सिस्टिमसाठी भारतीय अभियंते आणि काम करणाऱ्या नेत्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. सुरत डेपोमध्ये 3 (तीन) ट्रेन लाईन्स असलेली प्रशिक्षण सुविधा खास तयार करण्यात आली आहे. सुमारे 20 जपानी तज्ञ भारतीय अभियंते, पर्यवेक्षक आणि तंत्रज्ञांना सखोल प्रशिक्षण देतील आणि त्यांचे कौशल्य प्रमाणित करतील.

हेही वाचा -

  1. Mumbai Ahmedabad Bullet Train मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प बीकेसी स्थानकाबाबत या तारखेला रोजी निविदा जारी होणार
  2. Bullet Train BKC Station बुलेट ट्रेनच्या बीकेसी स्टेशनसाठी अखेर करारनामा असे असेल एकमेव भूमिगत स्टेशन
  3. Bullet Train Work बुलेट ट्रेनच्या कामावर दररोज असणार ड्रोनची नजर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.