मुंबई Mukesh Ambani Threat Case : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना धमकी देणाऱ्या आरोपीला तेलंगाणा येथून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक (Accused Vanpardhi Arrested) केली आहे. 19 वर्षीय तरुणाने उद्योगपती मुकेश अंबानी यांना ईमेलद्वारे धमकी दिली होती. मुकेश अंबानी यांनी 400 कोटी रुपये न दिल्यास त्यांना संपवण्यात येईल, असा धमकीचा इशारा ई-मेलवरून आरोपीने दिला होता. त्याचा शोध पोलिसांनी केला. तेलंगाणामधून आरोपी गणेश रमेश वनपारधी (Ganesh Vanpardhi) याला अटक केली आहे.
आरोपीच्या हालचालीवरून संशय बळावला : पोलिसांनी आरोपीला अटक करून ओळख निश्चित केली आहे. पोलिसांकडून त्याच्याबाबत प्राथमिक तपास केला असता, त्याचे वय 19 वर्षे आहे असे सांगितलं होतं. तसेच त्यानेच दोन ईमेलच्याद्वारे 400 कोटी रुपयांची मागणी केल्याचं प्राथमिक तपासात सांगितलं. त्यामुळे त्याच्या वागणुकीवरून संशय अधिक बळावत आहे.
दोन वेळा ईमेलने धमकी दिली : 31 ऑक्टोंबर 2023 आणि 1 नोव्हेंबर 2023 रोजी वेगवेगळे ई-मेल आरोपीने मुकेश अंबानी यांच्या ईमेलवर पाठवले होते. त्यात धमकी दिली होती. जर पैसे नाही दिले, तर त्याचा बदला म्हणून संपवले जाईल, असं ई-मेलमध्ये त्याने म्हटलं होतं. मुंबईच्या गावदेवी पोलिसांकडून याबाबत तपास सुरू केला होता. मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी देखील याबाबत तपास करत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक भोसले यांच्या देखरेखीखाली याबाबत तपास करण्यात येत होता.
न्यायालयाने आठ नोव्हेंबरपर्यंत तुरुंगवासात धाडलं : कनिष्ठ न्यायालयात आरोपी गणेश रमेश वनपारधी याला पोलिसांनी हजर केले. पोलिसांच्या वतीनं वकिलांनी न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी केली होती. केवळ हा आरोपी स्वतः असे गुन्हे करतो, की या पाठीमागे मोठी आरोपींची साखळी आहे? त्यामुळेच पोलिसांच्या वकिलांकडून विनंती झाल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने आठ नोव्हेंबर 2023 पर्यंत आरोपीची पोलीस कोठडी निश्चित केली आहे.
हेही वाचा -