ETV Bharat / state

'स्वामीजी का इशारा किसके तरफ हैं? ध्यानसे देखो और समझो'; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - ध्यानसे देखो और समझो

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी 'एक्स'वरुन एक व्हिडिओ पोस्ट केलाय. राऊतांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे.

Sanjay Raut
खासदार संजय राऊत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 4:04 PM IST

संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई Sanjay Raut Video Post : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपावर टीका केली होती. तसेच 'एक्स'वरुन एक व्हिडिओ पोस्ट करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार यांच्यावर टीका केली. हा व्हिडिओ जुना आहे. मात्र, संजय राऊतांनी तो आज 'एक्स'वरुन पोस्ट (Sanjay Raut Tweet) केलाय. या व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे दिसत आहेत. या व्हिडिओत जे गद्दार आहेत किंवा जे गद्दारी करतात, त्यांच्यावर महंतांनी शरसंधान साधले आहे. त्यामुळं हा व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लागू होतो, असा रोख राऊतांचा या पोस्टमधून दिसत आहे.

स्वामीजी का इशारा किसके तरफ हैं? : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'एक्स'वरुन व्हिडिओ पोस्ट करताना, त्यांचे अंगुलीनिर्देश हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. व्हिडिओ पोस्ट करत, 'स्वामीजी का इशारा किसके तरफ हैं? ध्यानसे देखो और समझो', असं कॅप्शन देखील राऊतांनी दिलंय. 'आज किसी भी देश मे देखो मुसलमान गद्दार नही है. मुसलमान मुसलमानसे गद्दारी नही करता है, दुसरे धर्म मे भी देखो किसी दूसरा धर्म भी गद्दार नही है, लेकिन हिंदू धर्म में हिंदूही सबसे गद्दार है', असं या महंतांनी म्हटल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दुर्भाग्य आहे, असं बारीक आवाजात म्हटलं होतं.

हिंदू धर्माला हिंदूंपासूनच अधिक धोका : पुढे या व्हिडिओत महंत म्हणतात की, सरळ आहे की, हिंदू धर्माला कुठल्या दुसऱ्या धर्मापासून धोका नाहीये, तर हिंदूंपासूनच अधिक धोका आहे. अशा गद्दार आणि धोकेबाज लोकांना ओळखून अशा हिंदूंना, गद्दारांना पाकिस्तानमध्ये पाठवा, असं यावेळी महंतांनी म्हटलं होतं. त्यावेळी सर्वांमध्ये एकच हशा पिकला. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्या व्हिडिओत आदित्य ठाकरेसुद्धा दिसत आहेत. या व्हिडिओतून अप्रत्यक्ष खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. राऊतांच्या या व्हिडिओनंतर शिंदे गटाकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट लावलं तर लोक जोड्यानं मारतील; 'त्या' बॅनरवरुन संजय राऊतांचं शिंदेंवर टिकास्त्र
  2. पाकिस्तानी दहशतवाद्यानंतर आता काही राजकीय नेते मुंबईवर हल्ला करतात- संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
  3. संजय राऊत यांच्याकडून पुन्हा 'मकाऊ अस्त्र', व्हिडिओ शेअर करत भाजपाला दिला 'हा' इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.