ETV Bharat / state

Shiv Sena Name Symbol : आमचा 'बाण' चोरीला; त्यांचा पर्दाफाश करणार- संजय राऊत तर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका करायला सुरूवात केली आहे. आमचा 'धनुष्यबाण' चोरीला गेला आहे. आम्हाला नंतर पक्षाचे नवीन चिन्ह मिळेल, परंतु त्यापूर्वी आम्ही या चोरांचा पर्दाफाश करू, असा प्रहार खासदार राऊत यांनी शिवसेनेवर केला आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील शिवसेनेवर टीका केली आहे.

MP Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Feb 18, 2023, 8:44 PM IST

मुंबई: खासदार संजय राऊत यांना निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरून ते म्हणाले की, आमचा 'धनुष्यबाण' चोरीला गेला आहे. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. आम्ही किंगपिन शोधून त्यांना लोकांसमोर आणू. आम्हाला काही दिवसानंतर पक्षाचे नवीन चिन्ह मिळेल, परंतु त्यापूर्वी आम्ही या चोरांचा पर्दाफाश करू असे सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

पुन्हा सत्तेत येऊ: खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, मतांसाठी शिवसेनेच्या नावाचा वापर केल्याचा आरोप भाजप करत आहे. आता ते बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग मतासाठी करतील. त्यासाठी त्यांनी आमचा ‘धनुष्यबाण’ चोरला आहे. शिवसेना हा सामान्य पक्ष नाही, आम्ही कायम राहू आणि भविष्यात पुन्हा सत्तेत येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आव्हानांचा सामना करावा लागेल: खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आश्चर्यचकित आणि निराशाजनक आहे. पण आम्हाला याचा सामना करावा लागेल. शरद पवारांनी म्हटल्याप्रमाणे, सद्यस्थितीतील आव्हानांचा सामना करावा लागेल आणि सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल. फक्त पार्श्वभूमी ही विसरता कामा नये की पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केला होता आणि तो कोणी चालवायचा हे त्यांनीच ठरवले होते.

ही बाळासाहेबांची ईच्छा होती: राज ठाकरे यांनी पक्ष सोडला, त्यांनी पक्षाची पकड घेतली नाही. त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली. तर, प्रत्येकाकडे हा एक पर्याय होता. मात्र या पक्षाला ज्याप्रकारे बळकावून हे सारे घडले ते अत्यंत दुःखद आणि निराशाजनक आहे. उद्धव ठाकरेंनी पक्ष चालवावा ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. हा निर्णय घेणे दुर्दैवी आहे कारण हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केला होता आणि उद्धव ठाकरेंनी तो चालवावा अशी त्यांची इच्छा होती, तर हा निर्णय उद्धव ठाकरेंकडून असायला हवा होता.

दोन्ही गटांचा धनुष्यबाणासाठी संघर्ष : गेल्या महिन्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर नियंत्रण ठेवण्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांची लेखी निवेदने निवडणूक आयोगाकडे सादर केली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला 'दोन तलवारी आणि ढाल' चिन्ह तर उद्धव ठाकरे गटाला 'ज्वलंत मशाल' हे निवडणूक चिन्ह देण्यात आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, धनुष्य आणि बाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. दरम्यान, काल निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि पक्षावर निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच असल्याचे आयोगाने सांगितले.

हेही वाचा: MP Navneet Rana On Uddhav Thackeray : 'जो राम का नहीं, जो हनुमान का नहीं, वो किसी काम का नहीं; उद्धव ठाकरेंवर राणांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.