ETV Bharat / state

...त्यांनी पाच वर्षात 'शिक्षणाच्या आयचा 'घो' केला - संजय राऊत

विधानपरिषदेत सात शिक्षक प्रतिनिधींनी आहेत. त्यांनी येऊन शिक्षकांच्या प्रश्नासाठी एक दिवस विधान परिषद बंद पाडायला हवी, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केले.

author img

By

Published : Feb 9, 2020, 3:03 AM IST

शिवसेना खासदार
संजय राऊत

मुंबई - मागील पाच वर्षात ज्याला शिक्षणाचे 'हो का ठो' कळत नव्हते त्यांना शिक्षण मंत्री केले गेले. त्यामुळे मागील सरकारने पाच वर्षात शिक्षणाचे काय केले हे सांगायचे तर एका शब्दात सांगायचे तर त्यांनी 'शिक्षणाच्या आयचा घो' केला, अशा शब्दात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी राज्यात झालेल्या शिक्षणाच्या अवस्थेवर बोलत भाजपवर निशाणा साधला.
वडाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक भारतीच्या अधिवेशनात ते बोलत होते.

संजय राऊतांची भाजपवर टीका

खा. राउत म्हणाले की, मागच्या सरकारच्या काळात माझ्याकडे शिक्षक त्यांचे प्रश्न घेऊन आले होते. तेव्हा मी बोलायचो थांबा, आपले सरकारने येईल. आणि आता राज्यात आपले सरकार आले आहे. या लोकांनी 5 वर्षात पुस्तकातील धडे बदलले, आपण सरकार बदलले. आणि त्याना मोठा धडा दिला. यांनी 5 वर्षात विष पेरण्याचा प्रयत्न केला, जे परंपरेने लाभले. ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. शिक्षकांना राजकीय कार्यकर्ते आणि गुलाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आता बदल झाला आहे, आपले सरकार आले आहे.
आपल्याकडे कंत्राटी शिक्षक नेमण्याची ही राज्याची परंपरा नव्हती. परंतु ती चुकीच्या धोरणामुळे आणली गेली. महाराष्ट्र घडवण्याचे काम शिक्षकांनी केले आहे, त्यामुळे मंत्रालयात शिक्षकांना ताठ मानेने जाता आले पाहिजे.

विधानपरिषदेत सात शिक्षक प्रतिनिधींनी आहेत. त्यांनी येऊन एक दिवस विधान परिषद बंद पाडायला हवी. माझी बायको शिक्षिका आहे, त्यामुळे मला प्रश्न कळतात. ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांना काम करून शिकायचे असते, त्यांच्या रात्रशाळा, महाविद्यालये पूर्वीच्या लोकांनी बंद केले. शिक्षकांचे खूप प्रश्न आहेत, त्यांच्या मागण्या खूप आहेत. मी कधी मंत्रालयात जात नाही, पण शिक्षकांच्या प्रश्नासाठी मी येईन, असे आश्वासन राऊत यांनी दिले.

Intro:
...त्यांनी पाच वर्षात 'शिक्षणाच्या आयचा घो' केला - संजय राऊत

mh-mum-01-sanjayraout-esdu-7201153

यासाठी 3g live वरून फीड घ्यावे)

मुंबई, ता. ८ :

मागील पाच वर्षात ज्याला शिक्षणाचे 'हो का ठो' कळत नव्हते त्यांना शिक्षण मंत्री केले गेले. त्यामुळे मागील सरकारने पाच वर्षात शिक्षणाचे काय केले हे सांगायचे तर एका शब्दात सांगायचे तर त्यांनी 'शिक्षणाच्या आयचा घो' केला अशा शब्दात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी राज्यात झालेल्या शिक्षणाच्या अवस्थेवर बोलत भाजपवर निशाणा साधला.
वडाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक भारतीच्या अधिवेशनात ते बोलत होते.
खा. राउत म्हणाले की, मागच्या सरकारच्या काळात माझ्याकडे शिक्षक त्यांचे प्रश्न घेऊन आले होते, तेव्हा मी बोलायचो थांबा, आपले सरकारने येईल. आणि आता राज्यात आपले सरकार आले आहे. या लोकांनी पाच वर्षात पुस्तकातील धडे बदलले आपण सरकार बदलले. आणींत्याना मोठा धडा दिला. यांनी पाच वर्षात विष पेरण्याचा प्रयत्न केला, जे परंपरेने लाभले. ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला.. शिक्षकांना राजकीय कार्यकर्ते आणि गुलाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आता बदल झाला आहे, आपले सरकार आले आहे.
आपल्याकडे कंत्राटी शिक्षक नेमण्याची ही राज्याची परंपरा नव्हती. परंतु ती चुकीच्या धोरणामुळे आणली गेली. महाराष्ट्र घडवण्याचे काम शिक्षकांनी केले आहे, त्यामुळे मंत्रालयात शिक्षकांना ताठ मानेने जाता आले पाहिजे. विधानपरिषदेत
सात शिक्षक प्रतिनिधींनी आहेत. त्यांनी येऊन एक दिवस विधान परिषद बंद पाडायला हवी. मी सांगतो माझी बायको शिक्षिका आहे त्यामुळे रोज मला प्रश्न कळत असतात.ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांना काम करून शिकायचे असते त्यांच्या रात्र शाळा, महाविद्यालये या लोकांनी बंद केले. शिक्षकांचे खूप प्रश्न, त्यांच्या मागण्या खूप आहेत ते सोडवण्यासाठी मी कधी मंत्रालयात जात नाही पण शिक्षकांच्या प्रश्नासाठी मी येईन असे आश्वासन राउत यांनी दिले.

Body:
...त्यांनी पाच वर्षात 'शिक्षणाच्या आयचा घो' केला - संजय राऊतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.