ETV Bharat / state

Rahul Shewale : 'त्या' महिलेचे पाकिस्तान आणि दाऊद गँगशी संबंध, एनआयएने तपास करावा; खासदार राहुल शेवाळेंचा आरोप

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे ( MP Rahul Shewale ) यांनी एका फॅशन डिझायनर महिलेचे ( fashion designer women ) शोषण केल्याचाआरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या आरोप केल्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत संबंधित महिलेवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, माझ्यावर ज्या महिलेने आरोप केले त्या महिलेचे कुटूंब गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहे. सदर महिलेचा भाऊ खुनाच्या आरोपी आहे. स्वतःच्या भावाच्या दहशतीची धमकी ती महिला सर्वांना देते. या महिलेचे थेट पाकिस्तान आणि दाऊदशी संबंध असल्याने या प्रकरणाचा तपास एनआयएने NIA करावा, अशी मागणी ( MP Rahul Shewale demand to NIA inquiry ) मी एनआयएच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

author img

By

Published : Dec 25, 2022, 4:11 PM IST

Rahul Shewale
खासदार राहुल शेवाळे
खासदार राहुल शेवाळे मुंबईत पत्रकार परिषद बोलताना

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे ( MP Rahul Shewale demand ) यांनी बुधवारी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी ( Sushant death case ) आदित्य ठाकरे यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल शेवाळे यांनी सीबीआयच्या तपासात रिया चक्रवर्तीला एका एयूने ४४ वेळा फोन केल्याचे असा आरोप केला. यानंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यासंबंधित खासदार राहुल शेवाळे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ( MP Rahul Shewale demand in Mumbai ) सदर महिलाही दाऊदशी संबंधित असून यात राष्ट्रवादीचा देखील संबंध असल्याचा आरोप केला आहे.

माझ्यावर खोटे आरोप : या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, "मी दिल्लीत सभागृहात दिशा सालीयन प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केल्यानंतर एका महिलेच्या आधारे माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. हे प्रकरण जुनंच मात्र आता ते पुन्हा उकरून काढले जाते आणि याच प्रकरणातील काही धक्कादायक खुलासे करण्यासाठी मी इथे तुमच्यासमोर आलो आहे. महाविकास आघाडी सरकार असताना माझ्या विरोधात कटकारस्थान सुरू होते. त्यानंतर माझी बदनामी करण्यासाठी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. जेव्हा माझ्यावर आरोप झाले त्यानंतर तब्बल एक वर्ष मी माध्यमांशी काहीही बोललो नाही. या सर्व प्रकरणाच्या मागे कोण आहे? याचा मी शोध घेत होतो.

त्या महिलेचे पाकिस्तानशी संबंध : पुढे बोलताना खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, "माझ्यावर ज्या महीलेने आरोप केले त्या महीलेचे कुटूंब क्रिमिनल बॅगराउंड असलेले आहे. सदर महीलेचा भाऊ खुनाच्या आरोपी आहे. स्वतःच्या भावाच्या दहशतीची धमकी ती महिला सर्वांना देते. सदर महीला दुबईत अडकल्यानंतर मी मदत केली. त्यानंतर त्या महीलेची अपेक्षा वाढत गेली. आज ही महिला खोटे फोटो दाखवत आहे. या महिलेने फेक अकाउंट बनवुन व्हिडीओ बनवले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. त्या महिलेचे दाऊद गॅंग बरोबर संबंध आहेत. हे पाकिस्तान कनेक्शन आहे. हे मोठं प्रकरण आहे." असा गंभीर आरोप खासदार शेवाळे यांनी केला आहे.

एनआयएने तपास करण्याची मागणी : "सदर महिला दुबईमध्ये मुस्लीम आहे असे दाखवते. ती पाकिस्तानी गॅंग सोबत आहे. या सर्व आरोपानंतर आम्ही साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सध्या साकीनाका पोलिस त्या महीलेला शोध घेत आहेत. दुबईच्या माध्यमातुन ब्लॅकमेल करण्यात आले असल्याने दुबई पोलिसांना आम्ही तक्रार केली. पाकिस्तान एजंट मार्फत हे सुरू आहे. सदर महीलेला दुबईमध्ये दुबई पोलिसांनी अटक केली होती. ही महिला तिकडे 86 दिवस तुरुंगात होती. अखेर तिला पाच हजार दर महिन्याच्या जामिनावर सोडण्यात आले. त्यानंतर ती महिला काही दिवस गायब होती. ती एप्रिल पासुन पुन्हा ॲक्टीव झाली आहे. यात थेट पाकिस्तान आणि दाऊदचा संबंध असल्याने या प्रकरणाचा तपास NIA ने करावा अशी मागणी मी NIA च्या अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच सोमवारी मी मुख्यमंत्र्यांची तसेच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे देखील या तपासाची मागणी करणार आहे."

युवासेना व राष्ट्रवादीचा सहभाग : या पत्रकार परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांनी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील गंभीर आरोप केले आहेत. सदर महिलेला युवा सेनेचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी माझ्या विरुद्ध भडकवत मला ब्लॅकमेल करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. तसेच सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा देखील या प्रकरणात संबंध असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.