मुंबई : नवनीत राणा यांच्या वकिलाने शिवडी कोर्टात अर्ज केला की, नवनीत राणा यांच्या संदर्भातील जात पडतानी प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू असल्याने शिवडी कोर्टाकडून करण्यात येत असलेली कारवाई थांबवण्यात यावी. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत ही कारवाई करू नये असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे.
सरकारी वकिलांचा युक्तीवाद : सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की नवनीत राणा यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेले प्रकरण आणि मुलुंड पोलीस स्टेशनमधले प्रकरण हे वेगवेगळे आहे. सुप्रीम कोर्टातील प्रकरण सिव्हिल तर शिवडी कोर्टात क्रिमिनल मॅटर आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाया थांबवण्यात येऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकीलांकडून करण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वकिलांकडून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याने कारवाईला स्थगिती देण्याची विनंती करीत, अर्ज मागील सुनावणी दरम्यान शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला होता. या अर्जावर सरकारी वकिलांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांकडून उत्तर दाखल करण्यात आले असून राणा यांच्या विरोधात सुरू असलेले कारवाई थांबवण्यास विरोध दर्शवला आहे.
अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र : लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी नवनीत व त्यांचे वडील हरभजन सिंग यांच्याविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शिवडी न्यायालयाने दोघांविरुद्ध चारवेळा अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. प्रकरण सध्या नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंग कोर त्यांच्यावर अटकेची तलवार कायम आहे. नवनीत राणा यांच्या विरोधात कलम 420, 468, 471 आणि 34 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवनीत आणि हरभजन सिंग रामसिंग कुंडलेशिवाय तिचे वडील देखील या प्रकरणात आरोपी आहे. नवनीत राणा यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा केल्याचा आरोप आहे. अमरावती मतदार संघ अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात राणा उर्फ नवनीत कौर हरभजन सिंग कुंडलेस आणि तिचे वडील हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडिल हरभजन सिंग यांच्यावर मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. नवनीत राणा यांनी त्यांच्या जातीचा बनावट दाखला दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात खटला चालू आहे. यानंतर राणा आणि त्यांचे वडील यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. जो दंडअधिकारी न्यायालयाने फेटळून लावला आहे. त्यानंतर या निर्णयात नवनीत राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात विशेष कोर्टाने अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करत सत्र न्यायालयाने शिवडी न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवून तोच निर्णय काय ठेवला आहे. त्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हेही वाचा : Navneet Rana : खासदार नवनीत राणा जात पडताळणी प्रकरणात पुढील सुनावणी 20 जानेवारीला, अटकेची टांगती तलवार कायम