ETV Bharat / state

मुख्यमंत्री फोन घेत नसल्याने राज्यपालांची घेतली भेट, राणा दाम्पत्याचा तक्रारीचा सूर - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विदर्भ मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा सांगण्यासाठी सतत फोन केले. मात्र, मुख्यमंत्री फोन घेत नाहीत. यामुळे राज्यपालांची भेट घेतल्याचे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी सांगितले.

राणा
राणा
author img

By

Published : Nov 4, 2020, 4:11 PM IST

Updated : Nov 4, 2020, 4:52 PM IST

मुंबई - विदर्भ मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा सांगण्यासाठी सतत फोन केले. मात्र, मुख्यमंत्री फोन घेत नाहीत. यामुळे राज्यपालांची भेट घेतल्याची तक्रार राणा दाम्पत्याने केली आहे. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई न दिल्यास मातोश्री बाहेर आंदोलन करण्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे. तर शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, अशी अपेक्षा खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे.

बोलताना राणा दाम्पत्य

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि वीजबिल माफ करण्यासंदर्भात तसेच शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर नवनीत राणा व रवी राणा बोलत होते.

मुख्यमंत्र्यांचे विदर्भाकडे दुर्लक्ष

मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत विदर्भाचा दौरा केलेला नाही. एकाही खासदाराशी मुख्यमंत्र्यानी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन विदर्भ आणि मराठवाड्याची परिस्थिती जाणून घेतलेली नाही. मुख्यमंत्र्यानी जे पॅकेज घोषित केले त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. प्रति हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई देऊ, असे मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे बोलले होते. मात्र, 10 हजार रुपये नुकसान भरपाई त्यांनी दिली आहे. विदर्भात कापसाचे व फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री भेटत नसल्याने तसेच फोन उचलत नसल्याने शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी मिळाली पाहिजे यासाठी राज्यपालांच्या भेटीला आलो आहोत. शेतकऱ्यांच्या व्यथा राज्यपाल मुख्यमंत्र्यांना कळवतील, असे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले. दिवाळी आधी नुकसान भरपाई मिळाली नाही तर फक्त ठाकरे कुटूंबियांच्या घरात दिवाळी साजरी होईल आणि शेतकऱ्यांच्या घरात मात्र अंधारच राहील, असेही त्या म्हणाल्या.

...तर मातोश्रीबाहेर आंदोलन

राज्यपालांच्या भेटीदरम्यान विदर्भातील कापूस, सोयाबीन आदी पिकांच्या नुकसानाची माहिती राज्यपालांना देण्यात आली. राज्यपाल ही माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले नाही तर, विदर्भातील शेतकऱ्यांना घेऊन मातोश्रीवर आंदोलन करावे लागेल, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे. जे मुख्यमंत्री फोन उचलत नाहीत ते शेतकऱ्यांना काय न्याय देणार, असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केला असून 'मातोश्री मस्त शेतकरी त्रस्त' असल्याचा टोला रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई न दिल्यास मातोश्री बाहेर आंदोलन करण्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे

सरकार केवळ शेतकऱ्यांची थट्टा करत आहे

राज्यातील अनेक जिल्ह्याला परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे लाखो हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. या नुकसानाची पाहणी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मागील नुकसानाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 हजार कोटी रुपये केवळ शेतीच्या नुकसानापोटी दिले होते. सध्या, उद्धव ठाकरे यांनी 5 हजार 500 कोटी रुपये फक्त शेतीसाठी दिले आहेत. राज्य सरकार उर्वरित पैसे हे महावितरण, रस्ते आदींसाठी देत आहे. त्यामुळे सरकार केवळ शेतकऱ्यांची थट्टा करत आहे, अशी टीका केली जात आहे. बांधावर 3 हजार 800 रुपयांचे धनादेश दिले. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 25 हजार रुपये मदत देण्याचा शब्द पाळा. तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना देऊ नका, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा - अर्णब गोस्वामींना अटक, सरकारच्या कारवाई विरोधात भाजप उभारणार जनआंदोलन

Last Updated : Nov 4, 2020, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.