ETV Bharat / state

आज.. आत्ता.. सकाळी ९ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर... - sharad pawar

दुष्काळी दौरे विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे दौरे म्हणून चालले असतील तर ते चुकीचे आहे, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादीला टोला लगावला. शरद पवारांच्या टीकेनंतर गडचिरोलीला सर्वाधिक १० वेळा भेट देणारे एकमेव मुख्यमंत्री असल्याचे भाजपकडून स्पष्टीकरण. रावसाहेब दानवे यांनी आपल्याला निवडणुकीत कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचे स्पष्टीकरण दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे. भारतामधील तरुणाई सर्वात अधिक निष्क्रिय असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ जॉन ब्ल्यूडॉर्न यांनी म्हटले आहे. तुम्ही भाजप बाबू 'जय श्री राम' म्हणता, आजपर्यंत एक तरी राम मंदिर बांधले आहे का, ममता बॅनर्जींची टीका

मुंबई
author img

By

Published : May 7, 2019, 9:15 AM IST

Updated : May 7, 2019, 10:00 AM IST

दुष्काळी दौरे म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे दौरे, शिवसेनेचा विरोधकांना टोला

मुंबई - महाराष्ट्रातील यंदाचा दुष्काळ भीषण आहे. त्यामुळे सर्वांनीच दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष द्यायला पाहिजे. दुष्काळी दौरे विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे दौरे म्हणून चालले असतील तर ते चुकीचे आहे. दुष्काळाचे राजकारण न करता कामाला लागा, असा टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून विरोधकांना लगावला आहे. तसेच सरकारच्या कामाचे कौतुक करून त्यांनी एकप्रकारे सरकारची पाठराखण केल्याचे या अग्रलेखातून दिसून येत आहे.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2H5OW11

मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीला सर्वाधिक दहा वेळा दिली भेट, पवारांना भाजपचे उत्तर

मुंबई - देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गडचिरोलीला सर्वाधिक १० वेळा भेट देणारे एकमेव मुख्यमंत्री असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. राज्य सरकारने गडचिरोली बाबत अनास्था दाखवल्यानेच नक्षली हल्ला झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. या टीकेला भाजपने हे उत्तर दिले आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये भाजपने शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2vEfgJh

रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीत कुठल्याही प्रकारची मदत केली नाही - हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद - रावसाहेब दानवे यांनी आपल्याला निवडणुकीत कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचे स्पष्टीकरण दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांनी युती धर्म न पाळता जावई धर्म पाळण्याचा आरोप केला होता. चंद्रकांत खैरे यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी वाट न पाहता ते सादर करावेत, असेदेखील हर्षवर्धन म्हणाले.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2YbKyU4

वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांतील देशापैकी भारतामधील तरुणाई सर्वात अधिक निष्क्रिय - आयएमएफ

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुका पार पडत असताना सरकारची चिंता वाढविणारे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतामधील तरुणाई सर्वात अधिक निष्क्रिय ( बेरोजगारीचा अथवा शिक्षणाचा अभाव असल्याने सक्रियतेचा अभाव) असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ जॉन ब्ल्यूडॉर्न यांनी म्हटले आहे. ते कामगार मनुष्यबळाच्या बाजारपेठ याविषयावर राजधानीत बोलत होते.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2WqLyD3

तुम्ही भाजप बाबू 'जय श्री राम' म्हणता, आजपर्यंत एक तरी राम मंदिर बांधले आहे का? - ममता बॅनर्जी

बिष्णूपूर - 'तुम्ही भाजप बाबू 'जय श्री राम' म्हणता, आजपर्यंत एक तरी राम मंदिर बांधले आहे का? केवळ 'जय श्री राम' म्हणून गाण्यातच सगळा वेळ घालवला. निवडणुका आल्या की रामचंद्र तुमच्या पक्षाचे 'एजंट' बनतात. तुम्ही स्वतः 'जय श्री राम' म्हणता आणि इतरांना म्हणण्यास भाग पाडता,' असे आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. त्या येथे सभेला संबोधित करत होत्या.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2Y8jcOv

Intro:Body:

Dummy

Conclusion:
Last Updated : May 7, 2019, 10:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.