गुजरातमध्ये भीषण अपघातात १० ठार, ६ गंभीर जखमी
आनंद - गुजरातमध्ये भीषण अपघातात १० जण ठार तर, ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. टँकर, ट्रक आणि पिक-अप व्हॅनची जोरदार धडक झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आनंद जिल्ह्यातील अंकलाव तालुक्यात गंभीरा गावाजवळ हा अपघात झाला. वाचा सविस्तर...
श्रीहरिकोटा येथून रीसॅट-२बी उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरीकोटा - सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र येथून ईस्रोच्या रीसॅट-२ बी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. पीएसएलवी-सी 46 रॉकेटद्वारे बुधवारी पहाटे ५:२७ वाजता उपग्रह अवकाशात झेपावला. वाचा सविस्तर...
मुंबईत जोगेश्वरी परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट; १४ जण जखमी
मुंबई - पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी, बेहराम बाग येथील हनुमान चाळीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन १४ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून सर्व जखमींवर नजीकच्या ट्रॉमा केअर व कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर...
काँग्रेसविरोधातील पाच हजार कोटींचा मानहानीचा खटला अनिल अंबानींकडून मागे
नवी दिल्ली/अहमदाबाद - उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने काँग्रेस तसेच नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राविरोधातील मानहानीचा खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबाद येथील न्यायालयात रिलायन्सने पाच हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकला होता. वाचा सविस्तर...
द्युती चंद म्हणते...त्यामुळेच मी समलिंगी असल्याचे केले जाहीर
नवी दिल्ली - भारताची महिला धावपटू द्युती चंदने शनिवारी आपण समलैंगिक असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. यानंतर भारतीय क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ माजली होती. आपला जोडीदार टीकेचा धनी बनेल या भीतीने २३ वर्षीय द्युतीने तिच्या जोडीदारीणीचे नाव जगासमोर आणले नाही. द्युतीने आज एका पत्रकार परिषदेत घेत सांगितले की आपल्या बहिणीच्या ब्लॅकमेलिंगला वैतागुन मी समलिंगी असल्याचे जगासमोर आणले. वाचा सविस्तर...