मुंबई - राज्यात सोमवारी (२० सप्टेंबर) २ हजार ५८३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. २८ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३ हजार ८३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६५ लाख २४ हजार ४९८ वर पोहोचली असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ६३ लाख ४० हजार ७२३ तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ३८ हजार ५४६ वर पोहोचली आहे.
राज्यात ४१ हजार ६७२ सक्रिय रुग्ण
राज्यात आज दिवसभरात ३ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ६३ लाख ४० हजार ७२३ झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१८ टक्के एवढे झाले आहे. राज्यात २ हजार ५८३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३८ हजार ५४६ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७१ लाख ६४ हजार ४०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख २४ हजार ४९८ (११.४१. टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ७५ हजार ७३६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात साध्य ४१ हजार ६७२ सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्णसंख्येत चढउतार
२६ ऑगस्टला ५ हजार १०८, ३० ऑगस्टला ३ हजार ७४१, ३१ ऑगस्टला ४ हजार १९६, १ सप्टेंबरला ४ हजार ४५६, २ सप्टेंबरला ४ हजार ३४२, ३ सप्टेंबरला ४ हजार ३१३, ४ सप्टेंबरला ४ हजार १३०, ५ सप्टेंबरला ४ हजार ५७, ६ सप्टेंबरला ३ हजार ६२६, ७ सप्टेंबरला ३ हजार ९८८, ८ सप्टेंबरला ४ हजार १७४, ९ सप्टेंबरला ४ हजार २१९, १० सप्टेंबरला ४ हजार १५४, ११ सप्टेंबरला ३ हजार ७५, १२ सप्टेंबरला ३ हजार ६२३, १३ सप्टेंबरला २ हजार ७४०, १४ सप्टेंबरला ३ हजार ५३०, १५ सप्टेंबरला ३ हजार ७८३, १६ नोव्हेंबरला ३ हजार ५९५, १७ सप्टेंबरला ३ हजार ५८६, १८ सप्टेंबरला ३ हजार ३९१, १९ सप्टेंबरला ३ हजार ४१३, २० सप्टेंबरला २ हजार ५८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.
मृत्यूदर २.१२ टक्के
१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५, १० सप्टेंबरला ४४, ११ सप्टेंबरला ३५, १२ सप्टेंबरला ४६, १३ सप्टेंबरला २७, १४ सप्टेंबआ ५२, १५ सप्टेंबरला ५६, १६ नोव्हेंबरला ४५, १७ सप्टेंबरला ६७, १८ सप्टेंबरला ८०, १९ सप्टेंबरला ४९, २० सप्टेंबरला २८ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्यूदर नोंदवण्यात आला आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - ४१७
अहमदनगर - ५०१
पुणे - २९८
पुणे पालिका - ९७
पिपरी चिंचवड पालिका - १०४
सोलापूर - १६०
सातारा - १६१
सांगली - ७५
हेही वाचा - 2021 वर्षाच्या बारावीच्या परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांनी 25 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन..!