राज्यात ६ हजार १७ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, ६६ रुग्णांचा मृत्यू - maharashtra corona news
राज्यात सोमवारी (दि. १९) ६ हजार १७ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. सध्या राज्यात ९६ हजार ३७५ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
मुंबई - राज्यात सोमवारी (दि. १९) ६ हजार १७ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून ६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज १३ हजार ५१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
९६ हजार ३७५ सक्रिय रुग्ण
राज्यात आज १३ हजार ५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख ९३ हजार ४०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३५ टक्के एवढे झाले आहे. आज आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ५६ लाख ४८ हजार ८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख २० हजार २०७ (१३.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६१ हजार ७९६ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ५२ व्यक्ती संस्थात्मकक्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९६ हजार ३७५ सक्रिय रुग्ण आहेत.
मृत्यूदर स्थिर
राज्यात शनिवारी (दि. १७ जुलै) १२४ रुग्णांचा मृत्यू झाला होता त्यात वाढ होऊन रविवारी (दि. १८ जुलै)१८० मृत्यूची नोंद झाली होती. आज रुग्णसंख्येत घट होऊन ६६ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे. गेले काही दिवस राज्यातील मृत्यूदर स्थिर आहे. यापूर्वी मृत्यूदर २.०३ ते २.०१ टक्के होता.
या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - ४०३
रायगड -२२४
अहमदनगर - ४२७
पुणे - ४३६
पुणे पालिका - २०२
सोलापूर - २८६
सातारा - ५४५
कोल्हापूर - ९०४
सांगली - ७९५
रत्नागिरी - २२१
हेही वाचा - पाळत ठेवून फोन हॅक प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, नवाब मलिकांची मागणी