ETV Bharat / state

मुंबईत 1 हजार 144 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 17 रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना बातमी

मुंबईत बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) 1 हजार 144 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Nov 25, 2020, 11:53 PM IST

मुंबई - मुंबईत 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती. गेल्या आठवडाभरात त्यात दुप्पटीहून अधिक वाढ झाली. बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) मुंबईत 1 हजार 144 नवे रुग्ण आढळून आले असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत बुधवारी कोरोनाचे 1 हजार 144 नवे रुग्ण आढळून आले असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 78 हजार 590 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 723 वर पोहोचला आहे. मुंबईमधून बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) 701 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 53 हजार 604 वर गेला आहे. सध्या मुंबईत 11 हजार 101 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 201 दिवसांवर

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 201, दिवस तर सरासरी दर 0.34 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 401 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 4 हजार 722 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 18 लाख 17 हजार 232 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या

16 नोव्हेंबर - 409
17 नोव्हेंबर - 541
18 नोव्हेंबर - 871
19 नोव्हेंबर - 924
20 नोव्हेंबर - 1 हजार 31
21 नोव्हेंबर - 1 हजार 92
22 नोव्हेंबर - 1 हजार 135
23 नोव्हेंबर - 800

कमी नोंद झालेली रुग्णसंख्या

7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण
10 नोव्हेंबर 535 रुग्ण
14 नोव्हेंबर 574 रुग्ण
16 नोव्हेंबर 409 रुग्ण

हेही वाचा - कोरोना अपडेट : परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवरील निर्बंध आजपासून लागू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.